Tuesday, July 28, 2026
Homeदेसाईगंज'अवैध वाळूचा उपसा अन् हळूहळू बोंबला..!' आरमोरी वरून देसाईगंज मार्गे अवैध वाळूची...

‘अवैध वाळूचा उपसा अन् हळूहळू बोंबला..!’ आरमोरी वरून देसाईगंज मार्गे अवैध वाळूची वाहतूक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-सध्या स्थितीत वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया बंद असल्याने ‘गडचिरोली जिल्हा अन् अवैध वाळू उपशावर भिल्ला’ असे चित्र हल्ली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागले आहे.अशातच देसाईगंज तालुक्यातील अवैध वाळू उपशाचे प्रकरण ताजे असतांनाच ‘अवैध वाळूचा उपसा अन् हळूहळू बोंबला..!’ अशी खात्रीशीर माहिती पुढे आली आहे.चक्क मध्यरात्रीच्या सुमारास आरमोरी तालुका परिसरातून देसाईगंज मार्गे अवैध वाळूची वाहतूक केली जात असून संबंधित विभाग निद्रावस्थेत गेला की काय? अशा चर्चांना उधाण आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार,शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा असल्याने आठवड्यातील शनिवार आणि रविवारी सुट्टी असते.त्यामुळे अधिकारी,कर्मचारी सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यात व्यस्त असतात.याच संधीचा फायदा अवैध वाळू उपसा करणारे चोरटे घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.दिवसा आराम करायचे आणि मध्यरात्री अवैध वाळू उपसा करून सुसाट वेगाने महामार्गावरूनच वाहने पळवायची,अशी शक्कल वाळू माफियांनी लढवली असल्याची खात्रीशीर माहिती आहे.माहितीनुसार काल,शनिवार १८ जानेवारीच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास चौकशी केली असता, आरमोरी तालुका परिसरातून मुख्य डांबरीकरण रस्त्याहून देसाईगंज मार्गे अवैध वाळू भरलेले टीप्पर मध्यरात्रीच्या सुमारास सुसाट वेगाने पळविली जात असल्याचे उघड झाले.महत्वाचे म्हणजे वाहतूक चालान असलेली वाहने ही सूर्योदय ते सूर्यास्तपर्यंत ठराविक कालावधीत सुरू असायला पाहिजे,मात्र या ठिकाणी वेगळीच परिस्थिती दिसून येत असल्याने ‘तो मी नव्हेच अशी तर भूमिका नाही ना..!’ त्यामुळे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने यावर त्वरित आळा घालावा; अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!