उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कोरेगाव परिसरातून कुरखेडा मार्गे छत्तीसगड येथे अवैधरित्या देशी दारूची वाहतुक होणार असल्याची गुपित माहिती पोलीस ठाण्याचे ठाणेदार किरण रासकर यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर,पोलीस अंमलदार ढोके व पोलीस अंमलदार संतोष सराटे यांनी सापळा रचून टिकाराम दुधराम राऊत वय २४ वर्षे रा.कोरंबीटोला,ता.अर्जुनी मोरगावजि.गोंदिया यास पकडुन देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सव सुरू आहे.त्यानुसार दसरा व दुर्गा विसर्जनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्याबाबत आदेश काढले आहे.या आदेशान्वये जिल्ह्यातील पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहेत.अशातच टिकाराम दुधराम राऊत याच्याकडून काळ्या रंगाची ॲक्टीव्हा दुचाकी वाहन क्र.एम एच ३३ ए ई ३८७१ किंमत ७००००/- रुपये तसेच देशी दारु संत्री कंपनीच्या ९० मि.ली.मापाच्या प्लॅस्टीकच्या ४०० नग सिलबंद बॉटल अंदाजे किंमत ३२०००/- रुपये असा एकुण १,०२,०००/- रुपये किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पोलीस स्टेशन देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन)कुमार चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान)अनुज तारे,उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन देसाईगंजचेपोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार संतोष सराटे,विलेश ढोके यांनी केली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करित आहेत.