Tuesday, March 25, 2025
Homeगडचिरोलीअर्ज एक योजना अनेक...महा-डीबीटीद्वारे २०.७७ कोटी रूपयांचे अनुदान वितरीत
spot_img

अर्ज एक योजना अनेक…महा-डीबीटीद्वारे २०.७७ कोटी रूपयांचे अनुदान वितरीत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- मागील दोन वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील १८०० शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलद्वारे २०.७७ कोटी रूपयांचे अनुदान मिळविले. गडचिरोली जिल्ह्यात आधुनिक शेती व नगदी पिकांसाठी शेतकरी जोमाने काम करीत असल्याचे यावरून दिसून येते आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जलद गतीने व पारदर्शक पध्दतीने अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच खिडकीद्वारे पोर्टलच्या सहाय्यातून मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने महा-डीबीटी हे संकेतस्थळ विकसीत केले आहे.या संकेतस्थळाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास आठराशे शेतकऱ्यांना सन २०२१-२२ व २०२२-२३ मधे २०,७७,९४,०४४ रूपये एवढे अनुदान देण्यात आले आहे.

महा-डीबीटी हे एकात्मिक संगणक प्रणाली असून एक खिडकी योजनाच आहे.यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि एकसूत्रता आली आहे.महा-डीबीटी पोर्टलवर कृषि यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन,भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,शेततळे खोदकाम,शेडनेट योजना,पॉलीहाउस, पॅक हाऊस,कांदाचाळ व शेततळे अस्तरीकरण या घटकांसाठी अनुदानाची सुविधा आहे.या व्यतिरीक्त ट्रॅक्टर,ट्रॅक्टर ट्रॉली,पॉवर टिलर,पॉवर विडर,रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर,नांगर,खते व बियाणे पेरणी यंत्र,पाचट कुट्टी,मल्चर,श्रेडर,ट्रॅक्टर ऑपरेटेड ब्लोअर,धान्य मळणी यंत्र,डाळ मिल,कंम्बाईन हार्वेस्टर,इनफिल्डर, प्लास्टीक पेपर मल्चींग,कोल्ड स्टोरेज,रायपनिंग चेंबर व प्रक्रिया युनिट आदी घटकांसाठीही शंतकऱ्यांना अर्ज करता येतो.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या सहाय्याने सदर लाभ एका अर्जद्वारे महाडीबीटी पोर्टलद्वारे वितरीत केला जातो.यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, मुख्यमंत्री शाश्वत शेती सिंचन योजना (सामुहिक/वैयक्तिक), डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना,फलोत्पादनाच्या एकात्मिक विकासासाठी अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- कडधान्य, पौष्टीक तृणधान्य व तांदूळ, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजनेत- कषि यांत्रिकीकरण,कांदा साठवणूक सुविधा, शेततळ्यांना कागदी आच्छादन,संरक्षित लागवड,भाजीपाला रोपवाटीका,अनुसूचित घटकासाठी नवीन विहीर इत्यादी, राज्य कृषि यांत्रिकीकरण,उप योजना कृषि यांत्रिकीकरण तेलबिया लागवडीत वाढ करणे इत्यादी.

असा करा अर्ज 👇

शेतकऱ्यांनी वरील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरून स्वत:च्या मोबाईलवरून,संगणक अथवा सामुदायिक सुविधा केंद्रावरून तसेच ग्रामपंचायत संग्राम कक्षामधून अर्ज करावा.नंतर तालुक्यातील तसेच जिल्हयातील सर्व अर्जाची सोडत काढण्यात येते.संगणक सोडतीत निवड झालेल्या शंतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यासाठी मोबाईलवर लघु संदेशाद्वारे कळविले जाते. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना महा-डीबीटी पोर्टलवर पुर्वसंमती देण्यात येते. पुर्वसंमतीमधे सुचीत केलेल्या कालावधीत निवड झालेल्या बाबींची शेतकऱ्यांना बाजारपेठेतून आपल्या पसंतीच्या उत्पादकाच्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून देयकाची छायांकित प्रत महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड करायची आहे. यानंतर अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते.

गडचिरोली जिल्ह्यात आज अखेर विशेष👇

 ट्रॅक्टर -३९३ – ५ कोटी रुपये,

 औजारे – २८५ – १.८८ कोटी रु.

सिंचन सुविधा विहिरी व शेततळे – ७०० – ९ कोटी रुपये 

कांबाइन हार्वेस्टर- १४ – १.५ कोटी रुपये

गेल्या १० वर्षात पहिल्या फलोत्पादन योजनेवर १ कोटी पेक्षा जास्त खर्च गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात फळबाग योजनेत काजू लागवडीचे विशेष पीक घेण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सुरक्षा दलांशी चकमक; तीन नक्षलींचा खात्मा..

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची तीव्र कारवाई सुरू आहे.नुकतेच गुरुवार २० मार्च रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत...

कारागृहातील बंदींसाठी ‘जीवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,सांस्कृतिक कार्य विभाग व कारागृह संचालनालय यांच्या वतीने आज,मंगळवार २५ मार्च रोजी गडचिरोली जिल्हा...

अवैध रेतीची वाहतूक अंगलट; रेती भरलेला टिप्पर उलटून चालक ठार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करतांना भरधाव वेगात असलेला टिप्पर उलटून चालक जागीच ठार झाला तर सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया...

पैसे घेण्याचा नवा फंडा; कामे मंजूर करून पैश्यासाठी बायकोच्या खात्याचा वापर.. – गडचिरोली जिल्हा नियोजन अधिकाऱ्याचा प्रताप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार भरमसाठ पगार (वेतन)असूनही अनेकांचे वरच्या कमाई शिवाय पोटच भरत नाही; असे वाटते.याला काहीजण अपवादही आहेत.त्यातच सुरुवातीला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!