Saturday, July 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदोन हजारांच्या नोटांचा थांग पत्ताच लागेना..!- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार २१४.२०...

दोन हजारांच्या नोटांचा थांग पत्ताच लागेना..!- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार २१४.२० कोटी नोटा चलनात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नोटबंदी जाहीर केली.त्यानुसार चलनातील ५०० व १,००० रुपयांच्या नोटा चलन बाह्य झाल्या व त्यानंतर २,००० हजाराची व इतर नोटा चलनात आल्या.इतर नोटा अजूनही चलनात तर आहेतच; मात्र दोन हजारांची नोट कुठे गायब झाली याचा थांगपत्ताच लागत नसल्याने सदर बाब नवलाची ठरली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२२ रोजीच्या आकडेवारीवरुन, २,००० रुपयांच्या एकूण २१४.२० कोटी नोटा चलनात आहेत. एकूण चलनाचा हा आकडा १.६% आहे.त्यांचे मूल्य ४,२८,३९४ कोटी रुपये आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा असूनही त्या मात्र व्यवहारातून कां गायब झाल्या, हा खरा प्रश्न आहे.

जर कां,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच चलनातील नोटांची जाण नसेल तर जनता-जनार्दन यांनी कुणावर विश्वास ठेवावा? व चलनातील एवढ्या मोठ्या नोटा गेल्या कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.देश हा डॉ. बाबा साहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारावर खरोखरच चालतो की काय? अशी परिस्थिती हल्ली निर्माण झाली आहे.’चलनातील दोन हजारांच्या नोटांनी बांधलाय फेटा’ असे विदारक चित्र दिसून येत आहे.यांस जबाबदार कोण? एकीकडे बँकांची बँक म्हणते की मोठ्या प्रमाणावर नोटा तर आहेत मात्र त्या गायब झाल्या कश्या व कुठे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

रेल्वेची धडक; सहा हरणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद हद्दीच्या तुकाराम नगर नजीकच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ट्रॅकवर तब्बल सहा हरीण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज,शनिवार...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८...

शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणाऱ्या मोफत साडी योजनेला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल २४ लाख ५८ हजार कुटुंबातील महिलांना दरवर्षी दिवाळीच्या सणात मोफत दिली जाणारी साडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!