Monday, May 25, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे राम जन्मोत्सव शोभायात्रा मोठ्या उत्साहात साजरी- जुना देऊळ हनुमान मंदीराची...

कोंढाळा येथे राम जन्मोत्सव शोभायात्रा मोठ्या उत्साहात साजरी- जुना देऊळ हनुमान मंदीराची १५० वर्षाची परंपरा कायम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे जुना देऊळ हनुमान मंदीराने १५० वर्षाची परंपरा कायम राखत गावामध्ये राम जन्मोत्सव शोभायात्रा  काढून राम नवमी उत्सव काल ३० मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोंढाळा येथील जुना देऊळ हनुमान मंदिराचे ट्रस्टी अरुण कुंभलवार,माजी सभापती नितीन राऊत,हल्ली ग्रामपंचायत उपसरपंच गजानन सेलोट,उमेश राऊत,बाबुराव राऊत,वासुदेव ठाकरे,श्रीराम मोहूर्ले,हितेश तुपट,सीताराम धोटे,रामदास गुरूनुले,श्रावण राऊत,सचिन झिलपे व गावकऱ्यांच्या पुढाकाराने १५० वर्षांपासून राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.राम जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून काल रात्री ९ वाजेच्या सुमारास संपूर्ण गावात शोभायात्रा काढून राम,लक्ष्मण,सीता,हनुमान व वानर सेना यांच्या वेशभूषेत असलेले आबाल यांनी गावातील शोभा यात्रे दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

युवा पिढी तसेच गावातील महिला-पुरुष वर्ग यांच्या करीता डिजेच्या ताल-सुरावर थिरकणारी मंडळी शोभा यात्रेचे विशेष आकर्षण दिसून येत होते.अशात प्रभू राचंद्रांच्या वेशभूषेत रोहन गुरूनुले,सीता जान्हवी कुंभलवार,लक्ष्मण समीर मोहुर्ले तर हनुमान नैतिक तुपट व अन्य वानर सेना लहान बालकांनी साकारून शोभा यात्रेची परंपरा कायम ठेवली.

शोभा यात्रे दरम्यान गावातील प्रथम नागरिक ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा नितीन राऊत,पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,गावातील आबालवृद्ध, जुना देऊळ हनुमान मंदीराचे ट्रस्टी,आयोजक तथा नियोजक व गावकरी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!