Wednesday, October 21, 2026
Homeब्रम्हपुरीदोन वर्षांपासून प्रेमाच्या आणाभाका टाकणाऱ्या प्रेमी युगुलांनी बांधली रेशीमगाठी

दोन वर्षांपासून प्रेमाच्या आणाभाका टाकणाऱ्या प्रेमी युगुलांनी बांधली रेशीमगाठी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील खरकाडा ( रनमोचन ) येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिराचे पदाधिकारी व तंटामुक्त गाव समिती तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून प्रेमी युगुलाच्या संमतीने स्थानिक महादेव मंदिरात बरडकीन्ही येथील प्रेमीयुगुलांचा विवाह संपन्न झाला.अमोल आनंदराव राऊत वय २५ वर्षे असे वर मुलाचे नाव असून कोमल रामभाऊ तलमले वय २१ वर्षे असे वधू मुलीचे नाव आहे.दोघेही बरडकीन्ही गावातील रहिवासी असून एकाच समाजाचे आहेत.

सदर मुलाचे मुली बरोबर गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंध जुळले होते.मात्र काही कारण लग्नासाठी त्यांना आळ येत असल्यामुळे त्या दोघांनीही गावाबाहेर पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.याची माहिती खरकाड्यातील स्थानिक ग्राम पंचायत माजी सरपंच रवींद्र ढोरे,गावातील पोलिस पाटील ढोरे,उपसरपंच ताराचंद पारधी,माजी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश ढोरे, बारा ज्योतिर्लिंग शिव मंदिराचे माजी सचिव तुकाराम ठाकरे, उपाध्यक्ष राजू पारधी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष हिरामण मुळे यांना देण्यात आली. त्यानुसार मुलीचे व मुलाचे कागदपत्र योग्य लग्नाच्या वयात बसतात काय याची चौकशी करून लेडीज बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थान खरकाडा येथे संपन्न झाला.यावेळी बरडकिन्ही गावातील कैलास बोडकुलवार, जितू माकडे, टिकाराम ढोरे डोंगरगाव, रवी बगमारे पिपळगाव, विनोद दोनाडकर रनमोचन यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!