उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- आपण नेहमीच हाताने व पायाने टायपिंग करणारे बघत असतो.मात्र त्याहीपेक्षा चक्क दाताने कॉम्प्युटर कीबोर्ड टायपिंग करतांना कधी बघितले काय? तर नाही ना! असाच एक युवक चक्क दाताने वेगवान गतीने कॉम्प्युटर कीबोर्ड टायपिंग करून विश्व विक्रम केला आहे.
चंद्रपुरातील बाबूपेठ येथील हर्षल दिलीप नेवलकर यांनी चक्क दाताने टायपिंग करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.इंग्रजी वर्णमाला वीथ स्पेस सर्वात जलद गतीने टाइप करण्याच्या कौशल्याची वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेशन एजन्सी लंडन (डब्लूआरसीए) द्वारे दखल घेऊन विश्वविक्रमधारक म्हणून प्रमाणित केले आहे.
बाबूपेठ येथील हर्षल नेवलकर या युवकाने कॉम्प्युटर कीबोर्ड टायपिंग या शैक्षणिक क्षेत्रात डोळ्यांवर पट्टी बांधून (ब्लाइंड फोल्डेड) (१८० डिग्री रोटेट) कॉम्प्युटर कीबोर्डवर ए टू झेड अल्फाबेट विथ स्पेस फक्त सहा सेकंदांमध्ये पूर्ण केले होते.दुसरा विक्रम म्हणजे हाताचा वापर न करता दातांमध्ये पेन घेऊन ए टू झेड अल्फाबेट विथ स्पेस फक्त १४ सेकंदांमध्ये टाईप केले.या दोन्ही विक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यापूर्वीच झाली होती.आता हर्षलला वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेशन एजन्सी लंडन (डब्ल्यूआरसीए) द्वारे दखल घेऊन विश्वविक्रमधारक प्रमाणित केले.हर्षल यांनी संपूर्ण इंग्रजी वर्णमाला विथ स्पेस सर्वात जलद गतीने टाईप करण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.