- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-अपघात ही अप्रिय व कटू घटना असली तरी अनेकांना नकळत मोठा आघात सहन करावा लागतो.अनेक कुटुंबे अपघातामूळे उध्वस्त होतात.घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने अनेकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. अशावेळी अपघात विमा हा जिवन परत मिळवून देऊ शकत नसला,तरी उध्वस्त,खचलेल्या कुटुंबीयांना जगण्याचे बळ मात्र निश्चितच देते.त्यामुळे सगळ्यांनी शाशन पूरस्कृत अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा; असे आवाहन कुरखेडा भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले आहे.
मागील दोन महिण्यापूर्वी कुरखेडा-वाकडी मार्गावर मनिष यादवराव लोहबंरे वय २५ वर्षे या यूवकाचा रस्ता अपघातात मृत्यु झाला होता.घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने लोहबंरे कुटुंबियांवर मोठा आघात झाला होता.मृतकाने केंद्र शासन पुरस्कृत भारतीय पोस्ट विभागाचे वार्षिक ३९९ रूपयाचे अपघात विमा पालीसी घेतली होती.पोस्ट विभागाद्वारे त्यांचा अपघात विमा दावा मंजूर करण्यात आला व त्यांच्या कुटुंबीयांना कुरखेडा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात १० लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय पोस्ट विभागाचे विभागीय व्यवस्थापक कैलाश काकडे,कुरखेडा शाखा व्यवस्थापक अभय किरकटे,कर्मचारी उमेश धमगाये,रमन राज,वैभव भावसार,नारायण आदमपुरे,अमोल पवार,लोकेश हटवार,मृतकाचा भाऊ छगन लोहबंरे तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे,शहराध्यक्ष सागर निरंकारी,तालुका महामंत्री प्रा.विनोद नागपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
- Advertisement -

