उद्रेक न्युज वृत्त :- राज्य सरकारने १७ मार्च २०२३ पासून महिलांना बसच्या प्रवाशी भाड्यात ५० टक्के सवलत दिल्याने राज्यभरात मोठ्या प्रमाणावर महिलांनी बसने प्रवास करण्याचा निर्धार केला की काय? असे सोशल मीडियावर हल्ली मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या व्हिडियोच्या माध्यमातून दिसून येत आहे.
बसचा प्रवास करण्याकरिता बसमधे भरगच्च महिलांची गर्दी आणि बसचा कंडक्टर तिकिटे काढण्याकरिता चक्क बसच्या सीट वरून तिकिटे फाडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.सदर व्हिडिओ नेमका कुठला आहे.हे कळू शकले नाही.मात्र महिलांची गर्दी आणि तिकिटे फाडण्याकरिता बसलेल्या प्रवाशांच्या वरून उड्या मारणारा कंडक्टर चर्चेचा विषय ठरू लागला आहे.