- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-राज्यात १५ ऑक्टोंबर पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश सगळीकडेच लागू केले आहे.मिरवणूका,पाच पेक्षा जास्त व्यक्ती, शिबिरे तसेच विविध कार्यक्रमांवर परवानगी न घेता आयोजन केल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.अशातच आचासंहितेला न जुमानता शिबिराचे आयोजन करणे चांगलेच महागात पडले असल्याची घटना काल,मंगळवारी २२ ऑक्टोंबरला भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली.चांदपूर येथील देवस्थान परिसरात निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याप्रकरणी निवडणूक भरारी पथकाने अज्ञात आरोपी विरोधात काल सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल केला.
विधानसभा निवडणूक काळात नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक तैनात आहेत.मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चांदपूर देवस्थान परिसरात निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी गावात या आरोग्य शिबिराची प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात आली होती.त्याप्रमाणे नियोजित वेळेत ५० महिला आणि १०० हून अधिक पुरुष आरोग्य उपचारासाठी दाखल झाले.
शिबिरात उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू दाखल झाली.आचारसंहिता लागू झाल्यानंतरही वैद्यकीय अधिकारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी दाखल झाले.हे एक न समजणारे कोडे आहे.सदरची माहिती निवडणूक भरारी पथक क्रमांक-१ चे प्रमुख नरेशकुमार इखारे यांना प्राप्त झाली.त्यानुसार भरारी पथकाने धाड टाकली.भरारी पथकाची धाड पडल्याचे कळताच शिबिरात उपचारासाठी आलेले वैद्यकीय अधिकारी आणि रुग्ण सैरावैरा शिबिरातून पळाले. विना परवानगीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर भरारी पथकाने अनेकांची विचारपूस केली.परंतु आयोजकांचे नाव भरारी पथकाला कळले नाही.यानंतर उशिरा अज्ञात आरोपीविरूद्ध सिहोरा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मुलचंद मेश्राम करीत आहेत.
- Advertisement -

