- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने ६७-आरमोरी (अ.ज.)विधानसभा मतदार संघ क्षेत्रात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज,मंगळवारी भेट देवुन निवडणुकी संदर्भात तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी यांनी आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट दिली.तसेच, देसाईगंज येथील स्ट्रांग रूमची तपासणी करून आवश्यक सुचना दिल्या.देसाईगंज तहसिल कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे निवडणुक कामाकरीता नियुक्त केलेल्या विविध विभागांना भेट दिली आणि निवडणुक कर्तव्य व जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सुचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
यावेळी ६७-आरमोरी (अ.ज.)विधानसभा क्षेत्राच्या निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी तसेच सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -

