Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरअधिकाऱ्यांना लाखो रुपये पगार असूनही कमीच पडू लागले होते.. - पैश्याची लालच...

अधिकाऱ्यांना लाखो रुपये पगार असूनही कमीच पडू लागले होते.. – पैश्याची लालच सुटली आणि सुरू झाला खेळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ज्यांना शिक्षण क्षेत्रातील कुठलाही अनुभव नाही,अश्यांना पैश्याच्या हव्यासापोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवायला विविध शाळेत नियुक्ती देणारे किती नालायक म्हणावे लागेल.आई-वडीलांनंतर ज्याला आपण गुरुवर्य म्हाणतो,असा शिक्षकच नकली निघत असेल तर याला काय म्हणावे? सिस्टम किती घोटाळेबाज झालाय.काही भ्रष्ट अधिकारी पैश्यासाठी वाट्टेल ते करायला लागलेत.पैसे देणाऱ्यापेक्षा सर्वात मोठा दोषी हा घेणाराच असतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.ज्याच्याकडे अमाप पैसा गोळा झाला तो काहीही विकत घेण्याचा प्रयत्न करतो.मात्र,विकणारा हा ठाम राहिला तर समोरच्या व्यक्तीचे पैसे हे बिनकामी होत असतात.बनावट शालार्थ आयडीमध्ये ‘पैसा करे कैसा’ असे झाले आहे. अधिकाऱ्यांना लाखो रुपये पगार असूनही कमीच पडू लागले होते.पैश्याची लालच सुटली आणि खेळ सुरू झाला.मात्र,म्हणतात ना ‘चोर कितीही चोऱ्या करत असला,तरीही तो एक दिवस सापडतोच’ आणि तसेच झाले व भांडा फुटला.एका पेंटरच्या कानावर नकली मुख्याध्यापकाची गोष्ट कानावर पडली अन् बोगस भरतीचा मोठा स्फोट झाला.आता घ्या म्हणावे शेकून.बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी नागपूर पोलिसांनी नुकतीच एसआयटी (विशेष तपास पथक)स्थापन केली आहे.एसआयटीने चौकशी सुरू केली असून,सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेचे सत्र सुरू आहे.यात तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी,चिंतामण वंजारी,उल्हास नरड,वैशाली जामदार यांना अटक करण्यात आली आहे.काहींनी जामीन मिळवला आहे.निवृत्त उपसंचालक सतीश मेंढेसुद्धा रडारवर आहेत.आणखी काही शिक्षणाधिकाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. दरम्यान, शिक्षण विभागानेही आपल्या स्तरावर ३९७ शाळांची चौकशी सुरू केली आहे.चौकशी अधिकारी पुण्यात ठाण मांडून आहेत.संबंधित शाळांच्या सर्व फायली मागविण्यात आल्या असून,प्रत्येक शाळेची कुंडली तपासली जात आहे.दरम्यान,वेतन पथक अधीक्षक कार्यालयामार्फत ९००  च्यावर शिक्षकांचे मार्च,एप्रिल महिन्याचे वेतन थांबविण्यात आले आहे.त्यामुळे आता कोण किती खोलात गेलेला आहे,हे पुढील सत्रात कळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!