Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीप्रसूतीची अंतिम तारीख उलटूनही रुग्णालयात जाण्यास नकार.. -प्रशासनाच्या तत्परतेने माता आणि बाळ...

प्रसूतीची अंतिम तारीख उलटूनही रुग्णालयात जाण्यास नकार.. -प्रशासनाच्या तत्परतेने माता आणि बाळ सुखरूप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-प्रसूतीची अंतिम तारीख उलटूनही रुग्णालयात जाण्यास नकार देत असतांनाच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे एटापल्ली तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील वाडसकला येथील २२ वर्षीय वीणा वासुदेव पोटवी या मातेला वेळेवर उपचार मिळाल्याने माता आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याने प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वीणा पोटवी यांची प्रसूतीची अपेक्षित तारीख २१ मे २०२५ असतांनाही,त्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य पथक जरावांडी येथे जाण्यास तयार नव्हत्या. मागील एक महिन्यापासून ‘९०-४२ दिवस मिशन’ अंतर्गत जरावांडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशिल घोनमोडे आणि आशा सेविका मीना आतला त्यांच्या घरी जाऊन नियमित तपासणी करत होत्या.१५ मे २०२५ पासून आरोग्य सेविका सुनंदा आतला आणि आशा ताई मीना आतला यांनी दररोज त्यांच्या घरी जाऊन आरोग्य सेवा दिली.डॉ.घोनमोडे यांनीही अनेक वेळा मातेची तपासणी केली,परंतु माता आणि त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात जाण्यास स्पष्ट नकार देत होते. मागील पाच ते सहा दिवसांपासून मातेच्या पायावर आणि चेहऱ्यावर सूजन वाढली होती.तसेच रक्तदाबही वाढत होता.यामुळे माता आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.ही गंभीर परिस्थिती माता आणि तिच्या नातेवाईकांना समजावून सांगूनही त्यांनी रुग्णालयात जाण्यास स्पष्ट नकार दिला.
अखेर प्रशासनाने घेतली धाव👇
काल सोमवार २६ मे २०२५ रोजी डॉ.प्रशिल घोनमोडे, ज्ञानेश्वर गिरहे (समुदाय आरोग्य अधिकारी,भापडा) आणि आरोग्य सेविका सुनंदा आतला यांनी पुन्हा एकदा ‘९०-४२ दिवस मिशन’ अंतर्गत घरी जाऊन तपासणी केली असता,मातेच्या चेहऱ्यावरील आणि पायांवरील सूजन तसेच रक्तदाब लक्षणीय वाढलेला दिसून आला.यावरही माता आणि नातेवाईक दवाखान्यात जाण्यास तयार नव्हते.डॉ.घोनमोडे यांनी तातडीने ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांच्या निदर्शनास आणली.डॉ.चौधरी यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल,तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे आणि गट विकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांच्याशी संपर्क साधून जरावांडी पोलीस स्टेशनमधून मदत मिळवली.
पोलीस आणि महसूल विभागाची साथ👇
जरावांडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती चव्हाण,श्रीमती इंगोले, एस.बी.तेलामी आणि सोपान उईके (महसूल सेवक) यांनी तातडीने मातेच्या घरी जाऊन तिची समजूत घातली.त्यांनी मातेला प्राथमिक आरोग्य पथक जरावांडी येथे नेले व कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.
पुढील उपचार आणि शासनाच्या योजना👇
प्राथमिक आरोग्य पथक जरावांडी येथे मातेची तपासणी करून प्राथमिक उपचार दिल्यानंतर,पुढील उपचारासाठी तिला जिल्हा महिला रुग्णालय गडचिरोली येथे हलवण्यात आले.प्रशासनाच्या तत्परतेने माता आणि बाळ सुखरूप आहेत.
महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग ‘शंभर टक्के संस्थात्मक प्रसूती’ व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे.गरोदर मातांना जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना,मानव विकास कार्यक्रम अंतर्गत बुडीत मजुरी योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ मिळावा,यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.या संपूर्ण घटनेवेळी प्राथमिक आरोग्य पथक जरावांडी येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!