- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याची घटना आज,रविवार १ डिसेंबरला दुपारच्या सुमारास पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावात उघडकीस आली.शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले वय ५१ वर्षे यांची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने निर्घृण हत्या त्यांच्यानिवासस्थानाजवळच केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
शिक्रापूर येथे आज दुपारी साडे बाराच्या सुमारास दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या निवासस्थानाच्या आवारात खुर्चीवर बसलेले होते. अचानकरित्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला.हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर वार केले.त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले.त्यांच्यावर वार केल्यानंतर आरोपींनी घटना स्थळवरून पळ काढला.घडलेल्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.लगेच गिलबिले यांना तात्काळ पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.
- Advertisement -