Wednesday, July 22, 2026
Homeभंडाराअज्ञात वाहनाची धडक; पती-पत्नी जागीच ठार..

अज्ञात वाहनाची धडक; पती-पत्नी जागीच ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-स्वतःच्या दुचाकीने परगावी लग्न समारंभासाठी जात असतांना वाटेतच अज्ञात पिकअप वाहनाने धडक दिल्याने धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना आज,मंगळवारी १८ फेब्रुवारीला सकाळी साडेसहाच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाटा येथे घडली.सदरचे पती-पत्नी हे नागपूर शहरातील नवीन पारडी येथील असून अपघातात रोशन महावीर साहू वय २८ वर्षे व चांदणी रोशन साहू वय २३ वर्षे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की,पती-पत्नी हे दोघेही आज मंगळवारी सकाळच्या सुमारास दुचाकी क्रमांक -एमएच ४९ बीयु ५८६४ ने नागपूरहून छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील तरोडी बोडा येथे लग्न समारंभासाठी जात होते.जात असतांना वाटेतच
भंडारा जिल्ह्याच्या चिखली फाट्याजवळ अज्ञात   पिकप वाहनाने त्यांच्या दुचाकी वाहनास धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की,दुचाकीस्वार पती-पत्नी शंभर फूट अंतरापर्यंत फरफकटत गेले असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शिंनी दिली.भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच जवाहर नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भिमाजी पाटील,पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड,पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर हाके,महेश कडव  घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करीत अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!