Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरअज्ञात इसमाने धारदार शस्त्राने झोपेतच चिरला गळा; ३५ वर्षीय तरुणाचा खून..!

अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने झोपेतच चिरला गळा; ३५ वर्षीय तरुणाचा खून..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :- जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात एक धक्कादायक घटना आज,शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.अज्ञात इसमाने एका ३५ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी झोपेतच धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचे आज सकाळच्या सुमारास उघडकीस आले.राजू आनंदराव सिडाम वय ३५ वर्षे,रा.मोहाळी,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत होता.
घटनेच्या दिवशी राजू सिडाम हा एकटाच घरी होता. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने झोपेतच त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरला.आज सकाळी शेजारील नागरिकांनी जाऊन बघीतल्याने घरात मृतदेह आढळून आला.लागलीच नागरिकांनी सिंदेवाही पोलिसांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.सिंदेवाही पोलिसांकडून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!