Tuesday, September 29, 2026
Homeभंडाराअचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार १० ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास घडली.
नेहमीप्रमाणे आज सोमवारच्या सकाळी मऱ्हेगाव येथील काही गुराखीगावा जवळच्या राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेले होते.उत्तरा थेर या देखील गुरे घेऊन जंगलात गेल्या होत्या.दरम्यान,परिसरातील वातावरणात अचानक बदल झाला आणि पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला.याचवेळेस उत्तरा थेर यांच्या जवळच वीज कोसळल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्या जागीच कोसळल्या.सदरचे दृश्य पाहून काही अंतरावर असलेल्या गुराखींनी मदतकार्य सुरू करून त्यांना पालांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र,डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून थेर कुटुंबियांवर दुःखाचे सावट पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी देसाईगंज तालुक्यात ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’.. – आज जुनी वडसा येथे विशेष शिबिराचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पुरवठा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देसाईगंज तालुक्यात सर्व शिधापत्रिका धारकांसाठी ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’ सुरू करण्यात आले आहे.देसाईगंज तहसील कार्यालयाच्या तहसीलदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!