Sunday, September 6, 2026
Homeनागपूरअखेर 'त्या' बेपत्ता तरुणाच्या खुनाचा उलगडा..! - पैसे परत करण्यावरून खून..

अखेर ‘त्या’ बेपत्ता तरुणाच्या खुनाचा उलगडा..! – पैसे परत करण्यावरून खून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला होता.तरुणाने पत्नीला घरी सोडून बाहेरून येतो,असे म्हणून तो घरी परतलाच नव्हता.अश्यातच त्याची दुचाकी वर्धा जिल्ह्याच्या रहाटी शिवारात तर मृतदेह नागपूरच्या कोंढाळीलगतच्या शिरमी शिवारातील जंगलात  शुक्रवारी आढळून आला होता.शरीरावरील जखमांमुळे त्याचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते.या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतले होते.
चौघेही कोंढाळी येथील रहिवासी होते.मात्र,पोलिस तपासात या चौघांचा खुनात सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले.मख्खनसिंग रणजीत सिंग बावरी वय ३८ वर्षे,रा.विकासनगर,कोंढाळी,ता.काटोल,जि.नागपूर असे मृताचे नाव आहे.तो पत्नीसह बुधवारी ३० जुलै रोजी कोंढाळी येथील आठवडी बाजारात गेला होता.रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याने पत्नीला घरी सोडून दिले आणि पुन्हा मोटारसायकलने बाजारात गेला.तो रात्री घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाइल फोनवर वारंवार संपर्क साधला.संपर्क होत नसल्याने त्यांनी त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याचा शोध घेणे सुरू केले.त्याची मोटारसायकल वर्धा जिल्ह्यात आढळून आल्याने कुटुंबीयांनी गुरुवारी तो बेपत्ता असल्याची कोंढाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.त्याअनुषंगाने ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व पोलिस उपनिरीक्षक धवल देशमुख यांनी कोंढाळी येथील महत्त्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.त्यातील एका फुटेजमध्ये तो बुधवारी रात्री ८:४१ वाजताच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींसोबत मोटारसायकलवर बसून जात असल्याचे निदर्शनास आले.त्यातच शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविला होता.त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व उपनिरीक्षक धवल देशमुख व संकेत नानोटी,हेड कॉन्स्टेबल नीतेश राठोड,सुनील ठोबरे,रजिक शेख यांच्या पथकाने मख्खनसिंगने व्याजाने ज्यांना रक्कम दिली होती,त्यांची चौकशी सुरू केली.या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात एपीआय किशोर शेरकी,मनोज गदादे,आशिषसिंग ठाकूर, विजय चिन्नोर यांच्या पथकानेही केला. मख्खनसिंगने आरोपींना रक्कम व्याजाने दिली होती,मात्र आरोपींनी त्याला रक्कम परत केली नाही.या सावकारीच्या व्यवहारातून आरोपींनी त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे.रियाज रफातुल्ला अली वय २३ वर्षे,रा.बलरामपूर,उत्तर प्रदेश,राहुल सबरजित गौतम वय २० वर्षे,रा.बतरवा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम बोरगाव, कोंढाळी व चुन्नीलाल बाबूराम चौधरी रा.बतरया जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम कोंढाळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.मख्खनसिंग हा अवैध सावकारीचा व्यवसाय करीत होता.त्याने कोंढाळी- वर्धा मार्गावरील बोरगाव शिवारात भंगार प्लॅस्टिक खरेदी करून त्याचा चुरा करण्याचा व्यवसाय करणाऱ्या उत्तर प्रदेश येथील चुन्नीलाल बाबूराम चौधरी याच्याकडे कामगार म्हणून काम करणाऱ्या रियाज अली याला ८० हजार रुपये,तर राहुल गौतम याला ५० हजार रुपये चुन्नीलालच्या माध्यमातून मख्खनने व्याजाने दिले होते.शिवाय,चुन्नीलाल यानेही मख्खनकडून तीन लाख रुपये व्यवसायासाठी घेतले होते.आरोपी रक्कम परत करीत नव्हते.त्यामुळे मख्खन हा दोघांना शिवीगाळ करीत धमकी देत होता.यामुळे आरोपींनी कट रचून बुधवारी ३० जुलैच्या रात्री ८ ते पावणे नऊच्या सुमारास कोंढाळी बाजार चौकातील दारूच्या दुकाना जवळून मख्खनला सोबत घेतले,त्यावेळी मख्खन हा दारूच्या नशेत होता. आरोपींनी त्याला पुन्हा दारू पाजली व त्याच्याच दुचाकीने कोंढाळी-वर्धा मार्गावरील वनविभागाच्या शिरमी डेपो परिसरात नेऊन आरोपी रियाज अली व राहुल गौतम या दोघांनी त्याच्यावर चाकूने वार करीत मख्खनचा खून केला.आरोपींनी मख्खनला दारूच्या नशेत असतांनाच आपल्या सोबत नेले.त्यानंतर आरोर्पीनी त्याला पुन्हा दारू पाजली.त्यानंतर शिरमी शिवारात नेऊन आरोपी रियाज अली व राहुल गौतम या दोघांनी त्याच्या पोटावर चाकूने १० वार करून मख्खनचा खून केला.मख्खनचा मृतदेह रोडलगतच्या झुडपात नेऊन फेकला.त्यानंतर आरोपींनी मख्खनची दुचाकी वर्धा जिल्ह्याच्या रहाटी शिवारात तोडफोड करून फेकली. तेथून ७ किलोमिटर अंतर पायी चालून आरोपी रात्री परत आले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!