Friday, September 4, 2026
Homeब्रम्हपुरीरूम खाली करण्यास बोलावले गुंडे; किरायदारास धो-धो धुतले.. - ब्रम्हपुरीच्या गुजरी वार्डातील...

रूम खाली करण्यास बोलावले गुंडे; किरायदारास धो-धो धुतले.. – ब्रम्हपुरीच्या गुजरी वार्डातील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-रूम खाली करण्यास सांगूनही किरायदार ऐकत नसल्याने घर मालकाने चक्क सात-आठ गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना बोलावून किरायदारास धो-धो धुतल्याची घटना ब्रम्हपुरीच्या गुजरी वार्डात काल शनिवारी घडली.प्रकरणी मारहाण झालेला किरायदार व घरमालक या दोघांनीही ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.वंदना भैसारे रा.गुजरी वॉर्ड,ब्रम्हपुरी असे घरमालकाचे नाव आहे,तर सचिन बांबोळे वय ३८ वर्षे, रा.किटाळी मेंढा, ता.नागभीड,जि.चंद्रपूर असे किरायदाराचे नाव असून आहार विशेषज्ञ म्हणून काम करतात.
ब्रम्हपुरीच्या गुजरी वार्डातील घरमालक वंदना भैसारे यांच्या घरी सचिन बांबोळे व त्यांचा मुलगा दिलशान
रूम करून किरायाने राहतात.किरायाची खोली खाली करावी यासाठी भैसारे यांनी वीज बिल वाढ व पाणी पट्टी वाढ केल्याने जे महिन्याचे पैसे ठरले,तेच मागा,असे सचिन बांबोळे यांनी विचारताच लवकर रूम खाली करा,अशी धमकी भैसारे यांनी देणे सुरू केले.घर मालकाच्या त्रासाला कंटाळून बांबोळे यांनी
१४ जुलै रोजी पोलिसात तक्रार दिली.त्यानुसार बांबोळे यांनी दुसरी रूम शोधायला सुरुवात केली.मात्र,रूम न मिळाल्याने त्यांनी रूम खाली करण्यास भैसारे यांना मुदत मागितली.अश्यातच दोन दिवसांपूर्वी शुक्रवार १ ऑगस्ट रोजी खोलीत असतांना घरमालकीण वंदना भैसारे,मुलगी प्रीती भैसारे यांनी सात-साठ युवकांना सोबत घेऊन भांडण सुरू केले.या तरुणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिली.यावरून पोलिसांनी आरोपी प्रीती भैसारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२),१८९(२),१९१ (२),३३3 व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.दरम्यान,भैसारे यांनीही तक्रारी केल्याने बांबोळे यांच्याविरुद्ध उशिरा गुन्हा दाखल झाला.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!