Tuesday, July 28, 2026
Homeभंडाराअखेर 'त्या' प्राचार्यास तब्बल १८ दिवसांची न्यायालयीन कोठडी.. - गुण वाढवून देण्याच्या...

अखेर ‘त्या’ प्राचार्यास तब्बल १८ दिवसांची न्यायालयीन कोठडी.. – गुण वाढवून देण्याच्या मोबदल्यात विद्यार्थिनींकडून शारीरिक सुखाची मागणी करणारे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या बहाण्याने प्राचार्याने चक्क शरीर सुखाची मागणी केल्याची घटना गुरुवारी २६ डिसेंबरला भंडारा येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.याबाबत पालकांना कळताच त्यांनी प्राचार्याला जाब विचारत चांगलेच झोडपले होते.किरण मुरकुट असे पालकांनी झोडपलेल्या प्राचार्याचे नाव आहे.
भंडारा येथे शासकीय नर्सिंग कॉलेज असून त्या ठिकाणी शेकडोच्या वर प्रशिक्षणार्थी ए एन एम (ANM)आणि जे एन एम (JNM) चे प्रशिक्षण घेतात.त्यातील काही विद्यार्थिनींना प्राचार्यांनी परीक्षेत पास करण्यासाठी गुण वाढवून देतो,अशी बतावणी करून काही मुलींना त्यांच्या व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवत शरीरसुखाची मागणी केली होती.त्यातील काही पीडित मुलींनी सदर प्राचार्याची तक्रार त्यांच्या पालकांना केली.त्यानुसार विद्यार्थिनींचे संतप्त पालक नर्सिंग कॉलेजमध्ये दाखल झाले.पालकांनी प्राचार्याला याबाबत विचारणा केली असता,त्याने सुरुवातीला उडवाउवीची उत्तरे दिली.त्यामुळे संतप्त पालकांनी प्राचार्याला झोडपून काढले होते.त्यानुसार अटकेत असलेल्या प्राचार्य किरण मुरकुट याची काल,शुक्रवारी २७ डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.पोलिसांनी त्याची पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती; मात्र ती फेटाळून ९ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
भंडारा शहरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात एएनएमच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत हा प्रकार घडला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधीनस्त असलेल्या या महाविद्यालयात किरण मुरकुट मागील दोन वर्षांपासून प्राचार्य पदावर कार्यरत आहे.या काळात त्याच्या वर्तनाबद्दल विद्यार्थिनींमध्ये चर्चा सुरू असतांनाच हे प्रकरण पुढे आले.पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर काल शुक्रवारी दुपारी त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दुपारी ३ वाजता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हिंगणघाटे यांच्या न्यायालयात हजर केले.पोलिसांनी तपासासाठी प्राचार्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली.मात्र,मोबाइल जप्तीसह अन्य सोपस्कार पार पाडल्यामुळे न्यायालयाने पोलिसांची  मागणी फेटाळून ९ जानेवारी २०२५ पर्यंत प्राचार्यास न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!