Saturday, August 29, 2026
Homeकुरखेडाअंत्यविधी व सरपणाकरीता निस्तार दरात जळाऊ लाकूड उपलब्ध करून देण्याची रविंद्र गोटेफोडे...

अंत्यविधी व सरपणाकरीता निस्तार दरात जळाऊ लाकूड उपलब्ध करून देण्याची रविंद्र गोटेफोडे यांची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-वन आगार कुरखेडा येथे अंत्यविधी व सरपणाकरीता वेळेवर जळाऊ बिट उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे,आगारात आवश्यक प्रमाणात जळाऊ बिट उपलब्ध होतील याकरीता नियोजन करावे व गोरगरिबांना निस्तार दरात बिट उपलब्ध करून द्यावे या मागणी करीता आज,बुधवार ८ एप्रिल रोजी माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांनी कुरखेडा येथील वन परिक्षेत्र कार्यालयात पोहचत वनअधिकाऱ्यांशी चर्चा करून मागणी केली.
शहर व तालुका वासीयांना अंत्यविधी क्रीये करीता वन आगारात नियमीत जळाऊ लाकूड बिट उपलब्ध असणे आवश्यक आहे.वेळेवर बिट उपलब्ध न झाल्यास पूर्वीच दुःखात असलेल्या कूटूंबाला दुःख बाजूला ठेवत लाकडाकरीता भटकंती करावी लागते. तसेच आगारात उपलब्ध बिटाचे प्रति बिट ३ हजार २०० रुपये दर असल्याने गोरगरिबांना ते आवाक्याच्या बाहेर ठरते.सदर अडचण लक्षात घेत किमान दरात किंवा निस्तार दरात ते उपलब्ध करून द्यावे,तसेच सद्या गॅस टंचाई सुरू असल्याने अनेक कुटुंबांना वेळेवर गॅस उपलब्ध होत नाही.तसेच घरात लग्न किंवा काही अन्य कार्यक्रम असल्यास जळाऊ बिटाची गरज असते.मात्र ते उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण होत आहे.सदर समस्या लक्षात घेत पूर्वी प्रमाणे निस्तार दरात कुटुंबांना जळाऊ बिट उपलब्ध करून देण्याची मागणी रविंद्र गोटेफोडे यांनी वन अधिकाऱ्यांकडे चर्चेत केली.यावेळी वनक्षेत्र सहाय्यक संजय कंकडलवार यांनी अंत्यविधी करीता असलेल्या बिटाचा दर कमी करण्याकरिता उपवनसंरक्षक स्तरावर मागणीसह ठराव पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले व मागील दोन वर्षांपासून निस्तार दरात आगारात जळाऊ बिट उपलब्ध नाहीत. मात्र यावर्षी कुप कटाईच्या नियोजन आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.पुढील १२ वर्षाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.जगंल कामगार सहकारी संस्था मार्फत कुप कटाईच्या कामाला सुरुवात होणार असल्याने पुढील वर्षांपासून कुटुंबांना निस्तार दरा प्रमाणे जळाऊ बिट कुरखेडा आगारात उपलब्ध राहतील,असे सांगितले.याप्रसंगी वनरक्षक एम.के. दुधबळे हे सुद्धा उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!