Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त३७ कोटी बेहिशेबी रोकड प्रकरणी मंत्र्याला 'ईडी' ने बजावले समन्स…

३७ कोटी बेहिशेबी रोकड प्रकरणी मंत्र्याला ‘ईडी’ ने बजावले समन्स…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- झारखंडमध्ये ३७ कोटी रुपये जप्त केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) झारखंडचे काँग्रेसचे आमदार आणि झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना समन्स बजावले आहे.

झारखंडमधील ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ‘ईडी’ने रांचीमधील एका फ्लॅटवर छापा टाकला.हा फ्लॅट मंत्री आल यांचे पीए संजीव लाल यांचा नोकर जहांगीर आलम याचा आहे.ईडीने या फ्लॅटमधून ३७ कोटींहून अधिक रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली होती.मंत्री आलम यांनी याप्रकरणी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचा दावा केला होता.

७० वर्षीय काँग्रेस नेते आलमगीर आलम हे झारखंडमध्ये ग्रामीण विकास मंत्री आहेत. विधानसभेच्या पाकूर मतदारसंघाचे ते आमदार आहेत.ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमितता प्रकरणी झारखंड ग्रामीण विकास विभागाचे माजी मुख्य अभियंता वीरेंद्र के राम,ज्यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासासंदर्भात छापे टाकण्यात आले होते.विभागातील काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी त्याचा संबंध आहे.२०१९ मध्ये,वीरेंद्र के.रामच्या अधीनस्थांपैकी एकाकडून मोठ्या प्रमाणात रोख जप्त करण्यात आली होती.नंतर, अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंध (पीएमएलए) कायद्यांतर्गत प्रकरण ताब्यात घेतले. झारखंड लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) च्या तक्रारीवरून वीरेंद्र के राम विरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला सुरु आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!