Wednesday, May 6, 2026
Homeदेसाईगंजहुलकावणी देणाऱ्या दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या; चारचाकी वाहनासह २५ पेट्या देशी दारु...

हुलकावणी देणाऱ्या दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या; चारचाकी वाहनासह २५ पेट्या देशी दारु जप्त… – देसाईगंज-कुरखेडा पोलिसांची संयुक्त कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी मार्गावरुन देसाईगंजच्या दिशेने एका चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार शैलेश तोरपकवार यांना मिळताच सदरची माहीती देसाईगंजचे ठाणेदार अजय जगताप यांना देताच हुलकावणी देणाऱ्या दारू तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.देसाईगंज-कुरखेडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत चारचाकी वाहनासह २५ पेट्या दारु जप्त केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,काल,सोमवार २० जानेवारीला सिल्वर रंगाच्या चारचाकी वाहनातुन दारुची तस्करी होत असुन ते वाहन आरमोरी मार्गाने देसाईगंजच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलीस हवालदार शैलेश तोरकपवार यांना मिळताच त्यांनी देसाईगंज पोलिस निरिक्षक अजय जगताप यांना दिली.जगताप यांनी ताफ्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष गोडबोले,पोलीस उपनिरिक्षक परदेशी यांना सोबत घेतले.तर दुसऱ्या पिकअप वाहनात पोलिस अंमलदार शैलेश,पो.हवा.राकेश.पो.हवा. नितेश यांना तैनात केले.पोलीस मागावर असल्याची खबर दारू तस्करास होताच त्यांनी मार्ग बदलून दारू असलेले वाहन सुसाट वेगाने शंकरपुर ते कुरखेडा मार्गाने पळविले. पिकअप वाहन मागावर असतांना सदरचे वाहन कुरखेडा पोलिसांच्या हद्दीत शिरले. अशातच सदरचे वाहन कढोली मार्गाने जात असल्याची माहिती अजय जगताप यांनी कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार वाघ यांना दिली.वाघ यांनी क्षणाचाही विलंब न करता कढोली गावचे पोलिस पाटिल यांना गावकऱ्यांच्या मदतिने वाहन थांबवण्याच्या सुचना दिल्या.पोलिस पाटिल व गावकऱ्यांनी ट्रक्टर,टायर व मोटार सायकल रस्त्यावर आडवे करुन रस्ता रोखला. सदर बाब लक्षात येताच दारु तस्कराने वाहन सोडुन पळ काढला.देसाईगंज पोलिस व कुरखेडा पोलिस यांनी वाहणाची झडती घेतली असता,त्यात २५ पेट्या देशी दारु आढळुन आली.सदरचे वाहन कुरखेडा पोलिस हद्दीत जप्त करण्यात आल्याने कुरखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदर घटनेची माहिती गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक निलत्पल यांना कळविण्यात आली असुन त्यांचे मार्गदर्शनासह अप्पर पोलिस अधिक्षक एम. रमेश, उपविभागिय पोलिस अधिकारी रविन्द्र भोसले यांचे मार्गदर्शनात दारु तस्करीची सखोल चौकशी सुरु असुन पळुन गेलेल्या दारु तस्करांना लवकरच गजाआड करण्यात येईल,अशी माहिती अजय जगताप यांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भारतीय कामगारांना इस्त्राईलमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकार आणि इस्त्राईल सरकार यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार,भारतीय कामगारांना इस्त्राईलमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने...

क्षुल्लकशा कारणासाठी पोटच्या नऊ वर्षीय मुलीची बापानेच केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडली असून क्षुल्लकशा कारणासाठी बापाने पोटच्या नऊ वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक बाब आज...

मंत्रिमंडळ निर्णय; अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ,नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज,मंगळवार ५ मे रोजी मंत्रीमंडळ बैठक पार पडली.या बैठकीत आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण...

आता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी ३.१५ लाखांचे अर्थसाहाय्य वस्तू स्वरूपात न देता थेट बचत गटांच्या बँक खात्यात होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने पुरवण्याच्या योजनेत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!