Wednesday, June 17, 2026
Homeमुंबईस्थानिक स्वराज्य संस्थांच्या नव्या इमारत बांधकामासह रिक्त पदे तात्काळ भरा.. - आमदार...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नव्या इमारत बांधकामासह रिक्त पदे तात्काळ भरा.. – आमदार रामदास मसरामांचा विधानभवनात गुंजला आवाज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कामे सुरळीत पार पाडण्यासाठी नव्या इमारत बांधकामासह रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा उचलून धरत शासनाने यावर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी विधानभवनात आवाज उठवला.मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचा काल,शुक्रवार १८ जुलै रोजी शेवटचा दिवस होता.प्रसंगी आमदार मसराम यांनी शासनाचे लक्ष वेधले.
आरमोरी मतदारसंघात देसाईगंज व आरमोरी या दोन नगरपरिषदा असून या दोन्ही ठिकाणी अद्याप जुन्या व जीर्ण इमारतींमधून कामकाज सुरू आहे.नागरिक व कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या दोन्ही नगरपरिषदेसाठी तात्काळ नवीन इमारती मंजूर करण्यात याव्यात.शासनाकडून यापूर्वी नवीन प्रशासकीय इमारतींची मंजुरी मिळाली होती.मात्र,काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या अडथळ्यामुळे ही मंजुरी शासनाकडे परत गेली आणि काम रखडले.अश्यातच कुरखेडा व कोरची या दोन नगर पंचायती आहेत.दोन नगर परिषद व दोन नगरपंचायतीतील रिक्त पदांमुळे आवश्यक असलेली प्रशासनिक यंत्रणा अपुरी पडत आहे.त्यामुळे नागरिकांसह येथील विकासकामांबाबत तसेच दैनंदिन शासकीय सेवांबाबत अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज सुरळीत व्हावे,यासाठी नव्या इमारत बांधकाम तसेच यातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत,जेणेकरून
नागरिकांना दिलासा मिळून प्रशासकीय यंत्रणा
गतिमान होण्यास मदत होईल,असेही आमदार मसराम यांनी विधानभवनात आवाज उठवत स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित...

आता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे,खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत,तसेच बोगस बियाणे विक्री,साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना...

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मिळून सुमारे ५३ हजार ६२२ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पूर्व विदर्भातील जलसंकट दूर करून शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जलसंपदा विभागाने वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती...

सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांना प्रति जोडपे २५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना आर्थिक आधार देण्यासाठी "सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!