Wednesday, October 14, 2026
Homeनागपूरसुरजागड प्रकल्प अवैध उत्खनन संबंधात उच्च न्यायालयात याचिका - याचिकाकर्त्याने प्रथम संबंधित...

सुरजागड प्रकल्प अवैध उत्खनन संबंधात उच्च न्यायालयात याचिका – याचिकाकर्त्याने प्रथम संबंधित प्राधिकरणाकडे जावे- उच्च न्यायालयाचा निर्णय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्पाबाबत नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात सूरजागडमधील बेकायदा खाणकामाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला.आता याच मुद्दयावर प्रकृती फाऊंडेशनच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल – करण्यात आली आहे.राज्य सरकारसोबत झालेल्या कराराचे उल्लंघन होत असून प्रशासनाला योग्य आदेश देण्याची विनंती याचिकेतून करण्याती आली होती. न्यायालयाने हे प्रकरण ऐकण्यास नकार दिला.योग्य • प्रक्रियेचा अलवंब करीत याचिकाकर्त्याने प्रथम संबंधित प्राधिकरणाकडे जावे.त्यानी विनंती मान्य न केल्यास याचिका करता येईल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

संबंधित विभागाकडे प्रश्न मांडूनही हा प्रश्न सुटला नाही, तर याचिकाकर्त्याला पुढील पाऊल उचलण्याची मुभा असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने हा अर्ज संबंधित विभागाकडे दाखल झाल्यास त्या अर्जावर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. हिवाळी अधिवेशनातही विधानसभेत या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान आमदारांकडून आक्षेप घेण्यात आला होता.बेशिस्त उत्खननाकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!