Monday, July 13, 2026
Homeनागपूरसासऱ्याच्या हत्येचे षडयंत्र रचणारी अर्चना पुट्टेवार प्रकरणात नवीन माहिती समोर…-अर्चनाने तीन आरोपींच्या...

सासऱ्याच्या हत्येचे षडयंत्र रचणारी अर्चना पुट्टेवार प्रकरणात नवीन माहिती समोर…-अर्चनाने तीन आरोपींच्या ‘मनाली टूर’ ची केली होती व्यवस्था 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 नागपूर :- अपघाताचा बनाव करून सरकारी अधिकारी असलेली सून अर्चना पुट्टेवार हिने एमएसएमई संचालक भाऊ प्रशांत पार्लेवारच्या मदतीने सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या केल्याच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. आरोपींनी एकदम थंड डोक्याने हा कट रचून त्यांची हत्या केली होती.म्हणूनच या हत्येनंतर किंचितही अस्वस्थ न होता दोन आरोपींनी हॉटेलमध्ये बसून पार्टी केली होती.तर अर्चनाने तीन आरोपींच्या मनाली टूरची व्यवस्था केली होती.

पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्यांची सून व गडचिरोलीत नगरविकास सहायक संचालक अर्चना पुट्टेवारसह तिचा चालक सार्थक बागडे,नीरज निमजे व सचिन धार्मिक यांना अटक केली होती.या प्रकरणात पोलिसांनी कुणाकुणाला सुपारीची रक्कम वळती करण्यात आली व कुणाचा हात होता त्याचा शोध घेतला.त्यात अर्चनाचा भाऊ व एमएसएमई संचालक प्रशांत पार्लेवार व आर्किटेक्ट असलेल्या पायल नागेश्वरचे नाव समोर आले.पायल, पार्लेवार तसेच सार्थक,नीरज व सचिन यांना न्यायालयाने १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.पोलिसांनी संकेत घोडमारे या आरोपीलादेखील अटक केली.पोलिसांनी तपास केला असता पुट्टेवार यांचा अपघात केल्यानंतर नीरज व सचिन यांनी एका हॉटेलमध्ये जाऊन पार्टी केल्याची बाब समोर आली. पोलिसांनी संबंधित हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजदेखील जप्त केले.याशिवाय नीरज,सचिन व सार्थक यांना मनालीला पाठविण्यासाठी अर्चनाने पूर्ण प्लॅनिंग केले होते.तिने त्यांच्यासाठी वाहनाचीदेखील व्यवस्था केली होती.मात्र त्याअगोदरच आरोपी पकडल्या गेल्याने सर्व आयोजित केलेल्या प्लॅन वर पाणी फेरल्या गेले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!