Monday, July 27, 2026
Homeभंडारासावधान..! महाराष्ट्र पोलीस डायल ११२ क्रमांकावर खोटी माहिती देणे पडेल महागात.. -...

सावधान..! महाराष्ट्र पोलीस डायल ११२ क्रमांकावर खोटी माहिती देणे पडेल महागात.. – हत्येची खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-महाराष्ट्र पोलीस डायल ११२ क्रमांक हा आपत्कालीन सेवांसाठी असून एखादी अनुचित घटना किंवा प्रकार घडत असल्यास पोलीस विभागाच्या वतीने जलद प्रतिसाद देऊन नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात येते.मात्र,काहीजण ११२ क्रमांकावर खोटी माहिती वा इतर गोंधळात टाकणारे घटनाक्रम सांगून पोलिसांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतात.असे करणे म्हणजे स्वतःला कायद्याच्या कचाट्यात ओढवून घेणे ठरू शकते.त्यामुळे गंमत म्हणून केलेला एक कॉल महागात पडल्याशिवाय राहणार नाही.अश्याच प्रकारे एका तरुणाने गंमत म्हणून डायल ११२ वर कॉल केला आणि एका तरुणीची हत्या झाल्याची खोटी माहिती दिली.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.मात्र, घटनास्थळी काहीही आढळून आले नसल्याने पोलीस अधीक्षक यांनी तरुणावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.सदर प्रकरण असे की,भंडारा येथील नवीन टाकळीच्या,भगतसिंह वॉर्डातील रिता रामभाऊ देशकर नामक सिमकार्ड असलेल्या क्रमांकावरून तरुणाने डायल ११२ वर फोन करून एका तरुणीची हत्या झाल्याची खोटी माहिती दिली.तरुणाने डायल ११२ क्रमांकावर सांगितले की,नगर परिसरात एका मुलीची हत्या करण्यात आली आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डायल ११२ च्या डिस्पॅचरने तात्काळ भंडारा पोलिसांना माहिती दिली.सूचना मिळताच वरठी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांचा स्टाफ घटनास्थळी दाखल झाले.मात्र,तपास केला असता कोणतीही हत्या किंवा गुन्हेगारी घटना घडलेली आढळली नाही.यानंतर पोलिसांनी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.परंतु फोन बंद येत होता.अखेर भंडारा सायबर सेलच्या मदतीने कॉल करणाऱ्याची माहिती मिळाली.त्यानुसार खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले.प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी गंभीर बाब मानून संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.त्यानुसार भंडारा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २१७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!