Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरसावधान..! तुमच्याही शहरात बनावट पनीर विक्री तर नाही ना.. - ४७२ किलो...

सावधान..! तुमच्याही शहरात बनावट पनीर विक्री तर नाही ना.. – ४७२ किलो ग्रॅम बनावट पनीर साठा जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-उन्हाळा कडकू लागला आहे.त्यामुळे बाजारात फळांच्या मागणीसह दुग्धजन्य पदार्थ व पनीर आदी पदार्थांची मागणी वाढली आहे.मागणी वाढताच भेसळीचे प्रमाण वाढत असते.त्यातच काही विक्रेत्यांना नागरिकांच्या आरोग्याशी कसलेही देणे- घेणे नसते.तुम्ही मरा किंवा जिवंत राहा,आमचा भला हिच आमची सेवा,अशी अनेकांची मनधारणा झाली आहे.अशातच चंद्रपूर शहरात बनावट पनीर विक्रीचा धक्कादायक प्रकार काल शुक्रवारी ७ मार्चला उघडकीस आला आहे.पनीरच्या नावाखाली चक्क चीज ॲनालॉग नावाच्या घातक पदार्थाची चंद्रपुरात विक्री केले जात असल्याचे धाडसत्रातून पुढे आल्याने पनीर शौकिनांनी तोंडावर हात ठेवले आहे.धाडसत्रात
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत तब्बल १ लाख ५० हजार २०० रुपयांचा ४७२ किलो ग्रॅम पनीर साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी.टी.सातकर यांनी बुधवारी चंद्रपूर येथील सपना डेली निड्सची तपासणी केली.त्यावेळी दुकानात चीज ॲनालॉग हा अन्नपदार्थ पनीर म्हणून विक्री करीत असल्याचे समोर आले.पथकाने दुकानातून ५१ हजार २०० रुपये किमतीचा १९७ किलो ग्रॅम साठा जप्त केला.गोलबाजार परिसरातील तिलक मैदानात न्यू भाग्यश्री घी भंडारातून ९९ हजार रुपये किमतीचा पनीर म्हणून विक्री केला जाणारा २७५ कि.ग्रॅ.चीज ॲनालॉग हा घातक पदार्थ जप्त करण्यात आला.अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने चंद्रपुरातील विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.त्यामुळे बनावट पनीर विक्री तुमच्याही शहरात केली तर जात नाही ना..! अश्या चर्चांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उधाण येऊ लागले आहे.याकडे त्या-त्या जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!