Wednesday, July 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान....! 'ट्राई' च्या नावाने तुम्हालाही येऊ शकतो बनावट संदेश... -सिम कार्ड...

सावधान….! ‘ट्राई’ च्या नावाने तुम्हालाही येऊ शकतो बनावट संदेश… -सिम कार्ड बंद होण्याची दाखवतात भीती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने वापरकर्त्यांना सिम कार्ड बंद करण्याच्या नावाने होणाऱ्या मोठ्या फसवणूकीबद्दल सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.असे मोठे फ्रॉड करणारे लोकांना फसवून त्यांची वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी भीती दाखवण्यासाठी नवे डावपेच वापरत आहेत.
ट्राईच्या नावाने बनावट संदेश पाठवून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.या संदेशांमध्ये ट्राईकडून पाठवले असल्याचा दावा केला जातो आणि तुमचे सिम कार्ड बंद होण्याची भीती दाखवून तुमची वैयक्तिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातो.या फसव्या संदेशांमध्ये तुमच्या आधार क्रमांकासह वैयक्तिक माहिती काढण्यासाठी kyc अपडेट करण्याची बनावट कारणे दिली जातात.
इतकेच नव्हे तर काही फसव्या संदेशांमध्ये kyc अपडेट करण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याची विनंती केली जाते आणि ते जमा न केल्यास तुमचा नंबर बंद होईल; अशी धमकी दिली जाते.अशा भीतीमुळे अनेक वापरकर्ते आपली वैयक्तिक माहिती देऊन फसतात आणि त्यांना लुटले जाते.ट्राईने अशा संदेशांना व फोन कॉल्सना बनावट असल्याचे
स्पष्ट केले आहे आणि वापरकर्त्यांना फसवणूक
करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नये; यासाठी वरील अलर्ट दिला आहे.सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता TRAI ने अशा संदेशांकडे आणि फोन कॉल्सकडे लक्ष न देण्याचा आणि त्या संबंधित दूरसंचार सेवा दात्याच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला
आहे.शिवाय,केंद्र सरकारच्या संचार साथी (चक्षु)
पोर्टलवर अशा संदेशांची तक्रार करता येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज, बुधवार २२ जुलै रोजी ५६ वा वाढदिवस संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार...

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!