Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरसायंकाळी गेला तो घरी परतलाच नाही; आढळले ते शरीराचे तुकडे..!

सायंकाळी गेला तो घरी परतलाच नाही; आढळले ते शरीराचे तुकडे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याची मालिका संपता संपेना.अश्यातच आता एक भयावह घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावनजिकच्या शेतशिवार परिसरात आज,रविवार १९ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.चराई करणाऱ्या बैलांना सायंकाळच्या सुमारास परत आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास वाघाने ठार तर केलेच,पण शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे केल्याचे दृश्य पाहून सर्वत्र एकच खळबळ माजली. भाऊजी पाल वय ५५ वर्षे,रा.चेकपिपरी, ता.गोंडपिपरी,जि.चंद्रपूर असे वाघाने ठार केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.चेकपिपरी गावातील शेतकरी भाऊजी पाल हे नेहमीप्रमाणे काल शनिवारी सकाळच्या सुमारास घरच्या बैलांना चराईसाठी घेऊन शेतावर गेले आणि बैलांना चारण्यासाठी मोकळे सोडून घरी परतले होते.परत सायंकाळी ते पुन्हा बैलांना घरी आणण्यासाठी शेताकडे गेले होते.मात्र,रात्र होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.पण त्यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता. त्यामुळे आज सकाळच्या सुमारास कुटुंबीयांनी ग्रामस्थांसह शोधमोहीम राबवली असता शेतशिवार परिसरात भयावह दृश्य दिसून आले.शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे विविध ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले.दृश्य पाहून अनेकजण अवाक् झाले.वाघाने शरीराचे तुकडे-तुकडे केल्याच्या  प्रकाराने वनविभागाचे अधिकारीसुद्धा स्तब्ध झाले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!