Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदिवाळी सण साजरा करतांना काळजी घ्या; अन्यथा एक क्षणाची चूक अन् आयुष्यभराचा...

दिवाळी सण साजरा करतांना काळजी घ्या; अन्यथा एक क्षणाची चूक अन् आयुष्यभराचा अंधार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिवाळीचा सण लख्ख प्रकाशाचा, आनंदाचा तितकाच काळजीपूर्वक साजरा करण्याचा आहे.घराघरांत फराळाची चव,आकाशकंदिलांची झगमग आणि फटाक्यांच्या आवाजात हरवलेली संध्याकाळ या सगळ्या आनंदात एक बाब अनेकदा दुर्लक्षित राहते,ती म्हणजे डोळ्यांची सुरक्षितता.दरवर्षी फटाक्यांमुळे हजारो लोक डोळ्यांची दुखापत होऊन दृष्टी गमावतात आणि हा आनंदाचा सण दुःखात परिवर्तीत होतो.एक क्षणाची चूक, आयुष्यभराचा अंधार होतो.त्यामुळेच वरिष्ठ नेत्ररोग तज्ञांनी काही महत्त्वाचे ‘डोळस’ सल्ले देत डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.फटाक्यांच्या दुखापतींमुळे होणारे अंधत्व ही एक जागतिक समस्या आहे.फटाक्यांत चारकोल,गंधक,नायट्रेट,क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात.या घटकाचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो.फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना, तसेच त्वचेला अपायकारक असतो.दमा व ॲलर्जीचे वाढते.फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण,जलप्रदूषण,वायुप्रदूषण व सामाजिक प्रदूषण होते.फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० डिग्रीपर्यंत वाढते.नेत्ररोग तज्ज्ञानुसार,फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना याची जास्त इजा होते.कारण,स्फोटामुळे दगड,माती वेगाने उडते व डोळ्याला व इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्यांत जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व व गंभीर दुखापतींमुळे डोळा गमवावा लागू शकतो.बारुदमुळे डोळ्यांना रासायनिक इजा होऊ शकते.अनार,सुतळी बॉम्ब,चक्री आणि रॉकेट यांसारख्या फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका सर्वाधिक असतो.फटाक्यांची लळी,पायली फोडतांना जमिनीवरील बारीक खट्टे वेगाने डोळ्यांत जाण्याची भीती असते. विशेष म्हणजे,सुतळी बॉम्ब सारख्या फटाक्यांवर मातीचे मडके ठेवून फोडले जातात.यामुळे मडक्याचे बारीक कण डोळ्यात खुपसण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे हे टाळणे गरजेचे आहे.फटाक्यांमुळे डोळा लाल होणे,पाणी जाणे,डोळा दुखणे,अचानक डोळ्याची नजर कमी होणे, उजेड सहन न होणे,डोके दुखणे,डोळ्यात चिपड येणे, डोळे सुजणे इत्यादी परिणाम दिसून आल्यास याकडे दुर्लक्ष करू नये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!