Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज शेकडो नक्षलवादी शस्त्रे टाकणार खाली अन् हातात स्वीकारणार संविधान..

आज शेकडो नक्षलवादी शस्त्रे टाकणार खाली अन् हातात स्वीकारणार संविधान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज संपूर्ण देश प्रकाशोत्सव साजरा करत असतांनाच,छत्तीसगडच्या गरियाबंद येथील उदंती क्षेत्र समितीतील सक्रिय नक्षलवादी(माओवादी)त्यांचा वर्षानुवर्षे चाललेला सशस्त्र संघर्ष संपवून नव्या जीवनाकडे वाटचाल सुरू करणार आहेत.महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोलीत नक्षली नेता भूपतीने ६१ साथीदारांसह आत्मसमर्पण केल्यानंतर आणि छतीसगडच्या बस्तरमध्ये २१० नक्षलवाद्यांसह
रूपेशने आत्मसमर्पण केल्यानंतर सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.अनेक नक्षलींनी लाल दहशत सोडून संविधान स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे.अश्यातच गडचिरोली,बस्तर येथील सामूहिक आत्मसमर्पणानंतर, उदंती पथकानेही सशस्त्र संघर्ष सोडण्याचा निर्णय घेतला,ज्यामुळे छत्तीसगडमध्ये शांततेची आशा निर्माण झाली आहे.आज,सोमवार २० ऑक्टोंबरला शेकडो नक्षलवादी शरण येणार आहेत.
नक्षलवादी सुनीलने जारी केलेल्या अपील पत्रानुसार, समितीने २० तारखेपासूनच आत्मसमर्पण प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.या पत्रात स्पष्टपणे उर्वरित तुकड्यांना सोमवारी दुपारी १२:३० वाजता सशस्त्र चळवळ थांबवण्यासाठी भेटण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सुनीलचे आवाहन संघटनेतील उदास वातावरण स्पष्टपणे प्रतिबिंबित करते.आपल्या मुद्द्याला महत्त्व देण्यासाठी,त्याने आपल्या साथीदारांना सांगितले, “प्रथम आपल्याला टिकून राहावे लागेल,आणि नंतर आपण संघर्ष सुरू ठेवू शकतो.” सुनीलने मान्य केले की,केंद्रीय नेतृत्व (केंद्रीय समिती)वेळेवर निर्णय घेण्यात अपयशी ठरले आणि त्यांनी अनेक महत्त्वाचे सहकारी गमावले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!