Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरआरो मशिन पहिल्यांदा घरी नेली; माहिती पडताच परत नेऊन ठेवली..!

आरो मशिन पहिल्यांदा घरी नेली; माहिती पडताच परत नेऊन ठेवली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर व स्तनदा मातांसाठी पोषण आहार,प्राथमिक आरोग्य सेवा,लसीकरण,आरोग्य तपासणी आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण या सेवा अंगणवाडीतून पुरविल्या जातात.अश्याच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभूर्णा तालुक्यातील उमरी-पोतदार येथील अंगणवाडीसाठी आरओ मशीन दिली होती.मात्र,अंगणवाडी सेविका आम्रपाली उपरे यांनी सदर आरओ मशीन स्वतःच्या घरी वापरासाठी नेल्याने मुलांना पिण्याचे शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागले.शासनाची मालमत्ता वैयक्तिकरित्या वापरणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्याची मागणी व तक्रार बालविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी केल्याने अंगणवाडी सेविकेने पहिल्यांदा घरी नेलेली आरो मशिन माहिती पडताच परत नेऊन ठेवल्याचा प्रकार घडला आहे.
  • आम्रपाली उमरे,अंगणवाडी सेविका,उमरी-पोतदार👇
सदर आरओ मशीन बिघडली होती.त्यामुळे ती दुरुस्तीसाठी घरी आणली होती.ती दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा अंगणवाडीमध्ये लावली आहे.मी माझ्या वैयक्तिक वापरासाठी आरओ मशीनचा कधीच वापर केलेला नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!