Friday, August 7, 2026
Homeभंडारासात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू मधुकर अंबादे वय ४१ वर्षे,रा.दिघोरी मोठी,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे लाचखोर महिला ग्रामसेवकाचे(ग्रामपंचायत अधिकारी)नाव असून त्या मोहरणा ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत.सदरची कारवाई ही काल गुरुवारी दुपारच्या सुमारास लाखांदूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील साकोली ते देसाईगंज(वडसा)मार्गावर करण्यात आली.
प्रकरणातील तक्रारदार तरुणास त्याच्या आईच्या नावाने मोहरणा ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतशिवारात पोल्ट्री फार्म म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा होता. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र(एनओसी)ची गरज होती.त्यामुळे तक्रारदार तरुणाने ग्रामपंचायत अधिकारी रंजू अंबादे यांच्याकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला होता. मात्र,नाहरकत प्रमाणपत्र लवकर पाहिजे असल्यास १० हजार रुपये लागतील,अन्यथा ७ हजार रुपये द्यावे लागतील,अशी मागणी अंबादे यांनी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली.तक्रारीच्या आधारे पथकाने लाच मागणीची पडताळणी केली असता,रंजू अंबादे यांनी ७ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाखांदूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील साकोली ते देसाईगंज(वडसा) मार्गावर सापळा रचला असता रंजू अंबादे यांना तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना  पथकाने रंगेहाथ पकडले.याप्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर,विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली,भंडारा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक नितेश देशमुख,पोलीस हवालदार अतुल मेश्राम,मिथुन चांदेवार,पोलीस नाईक मयूर सिंगनजुडे, विष्णू वरठी,सुमेध मेश्राम आणि महिला पोलीस अंमलदार दुर्गा साखरे यांच्या पथकाने  केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

मराठी भाषा विभागाचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित.. – नागरिक,विद्यार्थी व संशोधकांनी नवीन संकेतस्थळांचा वापर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागासह त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या एकूण सात संकेतस्थळांचे महाआयटी मार्फत नवीन डोमेनवर यशस्वी स्थलांतर करण्यात आले आहे.शासनाच्या धोरणानुसार...

रेशन दुकानातील मक्याचे करायचे काय? मका दळून मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली(रेशन)अंतर्गत गव्हासोबत किंवा काही प्रमाणात गव्हाऐवजी मक्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र,या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!