Friday, June 19, 2026
Homeनवी दिल्लीसर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती गॅसच्या किंमितीत वाढ; उद्यापासून नवे दर लागू...

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती गॅसच्या किंमितीत वाढ; उद्यापासून नवे दर लागू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-विधानसभा निवडणूक  कालावधीपासून आतापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडर दराच्या किंमतीत सातत्याने कमी-जास्त वाढ होत होती.महिन्याच्या १ तारखेला कंपन्यांकडून गॅस सिलेंडरचे दर ठरविण्यात येतात. अशातच आता घरगुती गॅस वापरणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज,सोमवार ७ एप्रिलला निर्णय जारी करीत केंद्र सरकारच्या एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. एलपीजी सिलेंडरच्या घरगुती गॅस वापराच्या १४.२ किलो दरात ५० रुपयांची वाढ केली आहे.सदरचा निर्णय हा उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस वापरकर्त्यांनाही लागू असणार आहे.सदरचे दर हे उद्या म्हणेजच मंगळवार ८ एप्रिल पासून लागू होणार आहेत.त्यामुळे उद्यापासून ५० रुपये अधिक किंमतीला गॅस सिलेंडर सर्वांना विकत घ्यावा लागणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच्या सिलेंडरची किंमत ही ५०० रुपयांवरून ५५० रुपये झाली आहे.तर इतर ग्राहकांसाठी सिलेंडरची किंमत ८०३ रुपयांवरून वाढून ८५३ रुपये झाली आहे.सदरच्या किंमती ह्या त्या-त्या स्थानिक क्षेत्रानुसार असणार आहेत.सरकारच्या या निर्णयामुळे गृहिणींचे बजेट बिघडणार आहे.घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यासोबतच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क वाढवले.शुल्कात २ रुपये लीटर इतकी वाढ केली.मात्र,यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत.हा खर्च पेट्रोलियम कंपन्या करतील.पेट्रोल डिझेलवर वाढवण्यात आलेल्या उत्पादक शुल्काचा उद्देश हा ग्राहकांवर ओझे टाकण्याचा नाही,असेही मंत्री पुरी यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!