Tuesday, October 6, 2026
Homeचंद्रपूरसरपण आणण्यासाठी गेलेल्या ३२ वर्षीय महिलेला वाघाने केले ठार...

सरपण आणण्यासाठी गेलेल्या ३२ वर्षीय महिलेला वाघाने केले ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील देवाडा बिट क्रमांक १६५ मध्ये गावापासून अवघ्या ५० फुटांवर सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला करून वाघाने महिलेचा बळी घेतल्याची घटना काल,मंगळवारी २८ मे रोजी दुपारी २ वाजता घडली.यामुळे खळबळ माजली आहे.ताडोबाच्या बफर झोन मध्ये मोहर्ली वनपरिक्षेत्रातील देवाडा नियतक्षेत्रात चंदा राजेश्वर चिकराम वय ३२ वर्षे ही महिला घरगुती वापरास्तव सरपण आणण्यासाठी गेली होती.त्यावेळी अचानक वाघाने हल्ला करून तिच्या नरडीचा घोट घेतला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे वन परिक्षेत्राधिकारी संतोष थीपे व पोलिस निरीक्षक लता वाळके आपल्या पथकासह तातडीने दाखल झाले.मृत व्यक्तीचे नातेवाईकांस तात्पुरती तातडीची ५० हजार रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत देण्यात आली आहे.लगतच्या जंगल परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे सतर्कतेचा इशारा वनविभागामार्फत देण्यात आलेला आहे.जंगलात न जाण्यापासून व वन्यप्राण्याच्या हल्ल्यापासून बचावासाठी जनजागृती करण्यात येत आहे.सदर परिसरात गस्त वाढविण्यात आलेली असुन वाघाचा मागोवा घेण्याकरीता ‘ट्रॅप कॅमेरे’ बसविण्यात आलेले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!