Thursday, August 27, 2026
Homeगोंदियासंपूर्ण विदर्भात गोंदिया जिल्हा सर्वाधिक "कुल".. - पुढील आठवडाभर थंडीची तीव्रता कायम..

संपूर्ण विदर्भात गोंदिया जिल्हा सर्वाधिक “कुल”.. – पुढील आठवडाभर थंडीची तीव्रता कायम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-राज्यात सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून बहुतांश भागांत किमान तापमानात लक्षणीय घट होण्यास सुरुवात झाली आहे.सध्या स्थितीत राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरल्याचे चित्र असून नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेत आहेत.मुंबई,पुणे,कोकण, मराठवाडा,विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील आठवडाभर थंडीची तीव्रता कायम राहील,असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार,राज्याच्या उत्तरेकडील भागांपासून मराठवाड्यापर्यंत काही दिवसांत तापमानात लक्षणीय घट होणार आहे.त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत सर्वत्र शेकोट्या पेटल्याचे दृश्य दिसत आहे.थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक,शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. सकाळी लवकर कामावर निघणाऱ्या दूध विक्रेत्यांना, भाजी विक्रेत्यांना आणि औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना या कडाक्याच्या थंडीचा जास्त सामना करावा लागत आहे.थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने बाजारात उबदार कपड्यांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे.राज्यात राजकीय वातावरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे तापले असले तरी, दुसरीकडे ही वाढलेली थंडी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.गहू आणि हरभरा यांसारख्या रब्बी पिकांसाठी सध्याचे तापमान अत्यंत पोषक असून,अनेक ठिकाणी रब्बी हंगामाच्या पेरण्यांनी वेग घेतल्याचे दिसून येत आहे.अश्यातच गत सप्ताहापासून गोंदिया शहराचा पारा चांगलाच घसरला असून काल रविवारी संपूर्ण विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक कमी ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.कडाक्याच्या थंडीने शहर गारठू लागले आहे.शहरावर सकाळी हलक्या धुक्याचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांचा दिवस उशिराने सुरू होत आहे.वाढत्या थंडीमुळे बाजारात उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!