Saturday, July 11, 2026
Homeनागपूरहत्येचा उलगडा..! अवैध सावकारीच्या वादातून भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची हत्या; दोन आरोपी अटकेत..

हत्येचा उलगडा..! अवैध सावकारीच्या वादातून भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची हत्या; दोन आरोपी अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपचे ४० वर्षीय वॉर्ड अध्यक्ष सचिन शाहू यांची हत्या अवैध सावकारीच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले असून पैशांच्या वादातून आरोपींनी शाहू यांची हत्या केली आहे.प्रकरणी पोलिसांनी आरोपी सोनू गौर आणि त्याचा भाऊ बाबू गौर यांना अटक केली आहे.गौर बंधूंच्या इतर दोन भावांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यातच, पोलिस प्रशासन गौर बंधूंवर मकोकाअंतर्गत कारवाईचा विचार करत आहेत.गौर बंधूनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने शनिवार १५ नोव्हेंबर रोजी दुपारी वीटभट्टी चौकात सचिन शाहू यांची हत्या केली.कुख्यात गौर बंधू बेकायदेशीर कर्ज देणे,जमीन हडप करणे,खंडणी आणि सट्टेबाजी यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. गौर बंधूंनी गुन्ह्यांद्वारे कोट्यवधींची संपत्ती गोळा केली आहे.ते सर्वजण ‘गोल्डन मॅन’च्या शैलीत दागिने घालून फिरतात.सचिन यांनी कोरोनादरम्यान गौर बंधूकडून ७० हजार रुपये उधार घेतले होते.पैसे परत केल्यानंतरही गौर बंधूनी व्याजाची मागणी सुरूच ठेवली.त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. गणेशोत्सवादरम्यान गौर बंधूनी सचिन यांना मारहाणही केली.पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.यामुळे गौर बंधू संतापले.बदला म्हणून त्यांनी सचिन यांची त्यांच्या मुलाच्या वाढदिवशी हत्या केली.या प्रकारामुळे जनतेत संताप निर्माण झाला.पोलिसांनी आतापर्यंत नागपूरमधून सोनू गौर आणि यवतमाळमधून त्याचा भाऊ बाबू गौर याला अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचा फरार भाऊ सीटू हा ट्रान्सपोर्टर बॉबी माकडच्या हत्येतही सहभागी होता व तो सध्या जामिनावर बाहेर आहे.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!