Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजसंपूर्ण देशात "Bamboo Man Of India” म्हणून ओळख असलेले पाशा पटेल यांचा...

संपूर्ण देशात “Bamboo Man Of India” म्हणून ओळख असलेले पाशा पटेल यांचा देसाईगंज नगरीत जंगी स्वागत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा)आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल,रविवार ३ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना देसाईगंज येथे भेट दिली.प्रसंगी आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णा गजबे यांचेसह विविध मान्यवरांच्या हस्ते शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात त्यांचे पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.
संपूर्ण देशात “Bamboo Man Of India” म्हणून ओळख असलेले पाशा पटेल यांचा बांबू व शेती वरील अभ्यास दांडगा आहे.बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. सोबत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी बांबू लागवड काळाची गरज आहे.देसाईगंज व क्षेत्रातील शेतकऱ्यांना समृद्धी देण्यासाठी बांबू लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले.दिवसेंदिवस वाढणारे तापमान,कमी होणारी जंगले आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीत मोठे नुकसान होत आहे. वाढलेल्या तापमानाचा फळबागा आणि शेतीतल्या इतर पिकांवरही नकारात्मक परिणाम होत आहे, ज्यामुळे उत्पादनात घट दिसून येत आहे.यावर एक प्रभावी आणि शाश्वत उपाय म्हणून बांबू लागवडीकडे पाहिले जात आहे.राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.देसाईगंज येथे आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेत पाशा पटेल बोलत होते.
वाढत्या तापमानाला आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी बांबूची लागवड हा एक चांगला उपाय आहे.बांबू पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतो.सोबतच,बांबूची लागवड अनेक अर्थांनी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.इतर फळझाडे आणि पिकांना वन्य प्राण्यांचा जास्त धोका असतो,ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.मात्र,बांबू लागवडीमुळे हा धोका कमी होतो,असे पाशा पटेल यांनी सांगितले.
बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार रोजगार हमी योजनेअंतर्गत विशेष अनुदान देत आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो, कारण बांबूला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. याचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये होतो,त्यामुळे बांबूची शेती शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकते.पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले  की,त्यांनी या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा आणि बांबूची लागवड करून हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यास मदत करावी.
यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पाशा पटेल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या भेटीदरम्यान,उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा व संवाद साधण्यात आला.
कार्यक्रमात पाशा पटेल,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे,ब्रम्हपुरीचे माजी आमदार अतुल देशकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारासागडे, उद्योजक दिनेश शर्मा यांच्यासह उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल,तालुकाध्यक्ष (ग्रामीण) सुनील पारधी,नरेश विटलानी,जिल्हा सचिव सचिन वानखेडे,तालुकाध्यक्ष (शहर )सचिन खरकाटे,सागर नाकाडे,तालुका महामंत्री वसंत दोनाडकर,महामंत्री योगेश नाकतोडे,मोहन गायकवाड,चक्रधर नाकतोडे सरपंच,कैलास पारधी,शंकर पारधी,कुलदीप आमले महामंत्री,युवा शहराध्यक्ष कपिल बोरकर,अब्राल शेख, संगम शेंडे,अमन रामटेके,प्रवीण तलमले,बादल रहाटे सह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!