Sunday, September 20, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय…..जर कां पत्रकारच नसते तर…..! 

संपादकीय…..जर कां पत्रकारच नसते तर…..! 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

संपादकीय :- आजच्याघडीला सर्वच जण झांगडगुत्ता करण्यात तल्लीन झालेले दिसून येत आहेत.प्रत्येक जण पैशासाठी हापापलेला आहे.देशात नाही तर जगात असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही की,मला पैसा नको केवळ मला माणुसकी हवी आहे; असा एखादा तरी दिवास्वप्न बघणारा व्यक्ती आहे काय? 

पूर्वी कित्तेकजण जेव्हा प्राथमिक शिक्षण घ्यायचे; तेव्हा शाळेतील मुख्य प्रवेश द्वारा जवळ लिहिलेले असायचे की, “यावे ज्ञानासाठी व निघावे सेवेसाठी”..! मात्र हल्ली ट्रेण्ड बदलेला आहे.”ज्ञान गेला चुलीत अन् पैसा आला पाहिजे खोलीत” पैसा असेल तर इज्जत अन्यथा बे इज्जत’अशी हल्ली प्रचिती निर्माण झाली आहे.पूर्वी तसेच हल्ली शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्यांना अजूनही धड आकडे मोड तसेच इंग्रजी भाषेचा ज्ञान नसूनही ‘पैसा करे कैसा’ असे दिसून येत आहे.त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या मार्गाने पैका गोळा करण्यात तल्लीन होऊन बसले आहेत.कुणी अवैध धंदे करून पैसा कमावतो तर कुणी अनेकांच्या मान मुरकटून पैसा कमवित असतो; मात्र अशांवर काही प्रमाणात तरी आळा घालणे सर्वप्रथम महत्वाचे आहे; अन्यथा कुणी कुणालाही मोजले नसते; ‘आम्ही करू ती पूर्व दिशा’ अशी अनेकांची मनधारणा निर्माण होऊन; प्रत्तेकजण अनेकांच्या उरावर येऊन बसला असता; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.अशातच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार अशी भारतीय संविधानाने ख्याती मिळवून दिली आहे.त्यानुसार पत्रकार कसा असावा? तसेच त्यांचे आद्य कर्तव्य काय? व त्यांनी कुठली भूमिका बजावली पाहिजे? अशी अनेक कार्ये पार पाडण्याकरिता संविधानाने मूलभूत अधिकार सर्वांनाच दिलेले आहेत.अनेकजण कायद्याच्या कचाटीत राहून अनेक कार्य बजावित आहेत.मात्र अनेकजण त्याचा गैर फायदाही घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र याला काहीजण अपवादही आहेत.अशातच जर कां पत्रकारच नसते तर…! काय झाले असते…वाचा फोडणाऱ्यांची मुस्कटदाबी होऊन कुणी-कुणाला जुमानले नसते; अनेकांना पूर्वीप्रमाणेच गुलामगिरी पत्करावी लागली असती; हे तितकेच खरे आहे व ‘त्यांना’ कुणीही आवरले नसते…! पत्रकार व वार्ताहर आहे म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण आहे,पत्रकार व वार्ताहर आहे म्हणून अधिकारी,कर्मचारी यांच्यावर लगाम आहे,पत्रकार व वार्ताहर आहे म्हणून अनेकांची बोलती बंद आहे,पत्रकार व वार्ताहर आहे म्हणून लोकप्रतिनिधी जागेवर आहेत; अन्यथा या कलयुगात कुणीही विचारले नसते व आपलाच बोलबाला करून अनेकांनी सर्वांची वाट लागली असती; त्यामुळे पत्रकार किंवा वार्ताहर यांना कमी लेखून चालणार नाही; अन्यथा अनेकांची धिंड निघाल्याशिवाय राहणार नाही; हे तितकेच खरे……!

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!