Monday, July 27, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय... साहेब...! एकाच पाण्याने तुरी पिकत नाही बरं..

संपादकीय… साहेब…! एकाच पाण्याने तुरी पिकत नाही बरं..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
संपादकीय :-या जगात मतलबी,कामसाधूपणा लोकांची कमी नाही.त्यांचे काम झाले की,सर्वकाही विसरून जातात.इतरांना दुरावून ज्यांच्यासाठी अथक परिश्रम घेतले,इतरांनी हिणावले अश्यावेळी धीर दिला,साथीदार म्हणून साथ दिली,परमेश्वराकडे साकडे घातले,शेवटपर्यंत कसून शेपूट धरली मात्र,आता तुम्ही कोण? म्हणणाऱ्यांची दुनियेत कमी नसल्याने “साहेब…! एकाच पाण्याने  तुरी पिकत नाही बरं..!” असे म्हणणे वावगे ठरणार नाही.आपण जेव्हा लहान असतो तेव्हा होशिन-हो लावून काम करवून घेत असतो.एकदा का मोठे झालो की,कुठला हो अन् कायचा हो..तू कोण अन् मी कोण? असे केले जाते.
पूर्वी ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ म्हणजेच प्राण गेले तरी चालेल,पण दिलेले वचन पूर्ण करणारच,अशी निष्ठा राखून कार्य केले जायचे.मात्र,सध्याच्या घडीला सुरू असलेल्या कलयुगात पूर्वीचे तर सोडाच,आज काय बोलणार व उद्या काय करणार,याची शास्वतीच राहिलेली नाही.माणसाच्या माणुसकीला काही किंमतच उरलेली नाही राव.
शहद जवळ असला की,माश्या घोंगवणारच,एकदा का शहद संपला की, इर्द-गिर्द घोंगावणाऱ्या माश्याही उडून जात असतात.अनेकांची मनधारणा झालीय की,पैश्यानेच सर्वकाही विकत घेतले जाऊ शकते; असे नाही तर त्यांना विचारा की,एखादेवेळी आपल्या नजरेसमोर एखादा अपघात झालाय तर त्याच्याकडे किती पैसे आहेत,हे आपण कधीही बघत नसतो.उलट त्याच्या मदतीला धाऊन शुभचिंतक बनत असतो. जगात आजही माणुसकी जपणारी माणसे आहेत. मात्र,याला काहीजण अपवादही आहेत.आज चुकून कळलय म्हणण्यापेक्षा चुकीची सुधारणा करणे आवश्यक आहे.माणूस मोठ्या पदावर विराजमान झाला की, त्यांना पूर्वीचे काहीही आठवत नाही; अशातला प्रकार वा भाग नसतो तर एखाद्या कडून उसनी अक्कल वापरून पुढील दशक्रिया दर्शविण्याचा प्रयत्न केला जात असतो.या दुनियेत स्वतःचे निर्णय हे स्वतःच घ्यावे लागतात.अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे झाल्याशिवाय राहणार नाही.
(सदर लेख कुणाला उद्देशून नसून सर्वसमावेशक आहे.)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!