Wednesday, July 29, 2026
Homeदेसाईगंजशेतकरी बांधवांच्या मागण्या मान्य हे आंदोलनाचे फलित - रामदास मसराम यांनी पत्रकार परिषदेत...

शेतकरी बांधवांच्या मागण्या मान्य हे आंदोलनाचे फलित – रामदास मसराम यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती….- अखेर देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांचे आंदोलन व उपोषण मागे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त         

देसाईगंज(गडचिरोली) :-  देसाईगंज तालुक्यात विद्युत प्रशासनाने दिलेल्या १२ तास विद्युत पुरवठ्याच्या हमीमुळेच कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिके उभी केली.मात्र ऐन रोवणीच्या काळातच विद्युत विभागाने लोडशेडींगचे कारण समोर करुन १२ तास विद्युत पुरवठ्या ऐवजी ८ तास पुरवठा असा नियम लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा व आमरण उपोषनाचा मार्ग अवलंबावा लागला.आंदोलनाची तिव्रता लक्षात घेवुन प्रशासनाने शेतकऱ्यांच्या दोन मागण्या पुर्ण केल्या. हे केवळ शेतकऱ्यांच्या संघटनात्मक आंदोलनाचे व आमरण उपोषनाचे फलित असुन राजकिय सत्ताधाऱ्यांनी याचे श्रेय लाटु नये; अशी माहिती रामदास मसराम यांनी आज,६ मार्च रोजी देसाईगंज विश्राम गृहातिल आयोजित पत्रकारपरिषदेत दिली.                   

पत्रकार परिषदेत माहिती देतांना शेतकरी नेते रामदास मसराम म्हणाले की,देसाईगंज तालुक्यातिल ग्रामिण भागातिल शेतकरी प्रामुख्याने रब्बी हंगामाकरिता कृषी पंपधारक शेतकरी धान पिक व मका पिकाची लागवड करतात.विद्युत विभागाने १२ तास सुरळित विद्युत पुरवठ्याच्या आश्वासनामुळेच शेतकऱ्यांनी शेतात पिकाची लागवड केली.मात्र ऐन रोवणी ची लागवड सुरु असतांना विद्युत प्रशासनाने लोड शेडींग चे कारण सामोर करुन १२ तास विद्युत पुरवठ्या ऐवजी ८ तास विद्युत पुरवठ्याचा नियम लावला.या जाचक अटीमुळे पिक धोक्यात आले.पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी विद्युत प्रशासनाच्या विरोधात१३ फेब्रुवारी ला घेराव आंदोलन  आंदोलन उभे केले.या रास्त मागणीसाठी पोलिस प्रशासनाने दडपशाहीचे धोरण अवलंबुन १८ शेतकऱ्यांवर अप क्र. ५४ / २०२४ नुसार गुन्ह्याची नोंद केली.तरीही शेतकरी घाबरले नाही.शेतकऱ्यांचे प्रतिनिधी श्याम मस्के पाटलांनी २६ फेब्रुवारी पासुन उपविभागिय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. दिवसेंदिवस मिळणाऱ्या आंदोलनाच्या समर्थनाला प्रशासन घाबरले याची दखल घेवुन विरोधी पक्षनेते विजय भाऊ वडेट्टीवार यांनीही भेट देवुन दोन दिवसात मागण्या मान्य करण्याची प्रशासनाला विनंती केली.शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत प्रशासनाने १० एमव्हीके चे अतिरीक्त फिडर शंकरपुर पॉवर स्टेशन ला लावुन दिले.त्यानंतर काल उर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांनी आजपासुन १२ तास सुरळित विजपुरवठा करण्यात येत असल्याची घोषणा केली. हे सर्व शेतकऱ्यानी घेतलेल्या आक्रमक पावित्र्याचे फलित असुन यात काही राजकिय नेते तथा सत्ताधारी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करित आहेत.हे योग्य नाही.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांचे संघटन नेहमीच तत्परतेने काम करेल; अशी माहिती शेतकरी नेते रामदास मसराम यांनी दिली. या आंदोलनात कृषी केंन्द्र संचालकांनी व इतर संघटनांनीही पाठिंबा दिला. त्या सर्वांचेही आभार मानले.या प्रसंगी उपोषनकर्ते श्याम मस्के पाटिल,परसराम टिकले,विलास बन्सोड, कमलेश बारस्कर,प्रमोद पत्रे,शामकांत शेन्डे,गोपाल नाकाडे,शेखर कुथे,चित्तरंजन नाकाडे,लिलाधर पर्वते, प्रशांत किलनाके,परसराम ठाकरे,शुभम नागपुरकर, होमराज गायकवाड यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नक्षल चळवळीतील शेवटचा सक्रिय सर्वोच्च नेता मिसिर बेसरा याची झारखंडच्या सारंडा जंगलात अन्नावाचून कोंडी झाल्याने मोजक्या नक्षलवाद्यांसह जंगलात भटकत असतांनाच त्याच्या अंगरक्षकासह...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!