Tuesday, September 22, 2026
Homeदेसाईगंजपोटगांव येथे राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिर….

पोटगांव येथे राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिर….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पोटगांव(देसाईगंज) :-औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे पोटंगाव येथे निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिराचे आयोजन दिनांक- ५ मार्च रोजी करण्यात आले.

सदर शिबिरामध्ये देसाईगंज येथील ताज कम्प्युटरचे संचालक अमित अंसारी यांनी युवकांनी आयटीआय करून स्वयंरोजगाराची व उद्योगाची कास धरावी; असे मोलाचे मार्गदर्शन केले.पंकज लाडे नेहरू युवा केंद्र तालुकाध्यक्ष देसाईगंज यांनी सायबर क्राईम व पोक्सो कायदा याविषयी मार्गदर्शन केले.प्रत्येकाने जीवनात सत्याचे शोधन करून संत व महामानवाचे विचार घ्यावे व स्पर्धेच्या युगात अभ्यास व परिश्रमाने जीवन उज्वल करावे; असे मौल्यवान मार्गदर्शन विजय बन्सोड(सामाजिक कार्यकर्ते) यांनी केले.

सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून पंकज वंजारी (उपसरपंच),सुरेश एस.चौधरी प्राचार्य व रविकांत गोतमारे(गटनिदेशक)यांच्या मार्गदर्शनात सदर शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.एम.गरमळे रासेयो मुख्य समन्वयक यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणय राऊत रा.से.यो.चे प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी यांनी तर आभार प्रदर्शन कु.सानिया पठाण रा.से.यो.प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी यांनी केले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती एम.एस जाधव गटनिदेशिका होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री.व्ही.वाय.नागमोती एन.एस.एस. सह समन्वयक ए.व्ही.भोले,सी.डी.समर्थ,कुमारी क्षमा बोंद्रे,कु.मेघा चौदंते,एस.ए.पिलारे,एच.एस.मरसकोले, तसेच रात्री गावकऱ्यांच्या मनोरंजनाकरिता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विजय दडमल (सरपंच पोटगाव) यांनी उद्घाटन करून सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात आले.शिबिरातील सर्व स्वयंसेवक व गावकऱ्यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!