Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजशिवरायांच्या एकात्मतेचा दृढ विश्वासच त्यांच्या यशस्वीतेचा मजबूत पाया...- सुदर्शन शिंदे यांच्या शिवव्याख्यानाच्या...

शिवरायांच्या एकात्मतेचा दृढ विश्वासच त्यांच्या यशस्वीतेचा मजबूत पाया…- सुदर्शन शिंदे यांच्या शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमा प्रसंगी,आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- माणसाने माणसाशी माणुस म्हणुन बोलायला नी वागायला शिकले की सुसंस्कृत समाजाची निर्मिती आपोआप होते.मात्र अलिकडे ही भावनाच लोप पावत चालल्याने समाजाची वाटचाल अराजकतेकडे सुरु असल्याचे दिसून येते.जे की भावी पिढीसाठी धोक्याची घंटा आहे.यातुन वेळीच सावरण्यासाठी व शिवरायांना अभिप्रेत असलेल्या समाज निर्मितीसाठी समाजात मानवता अधिक प्रभावीपणे रुजवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

देसाईगंज येथे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती उत्सव समिती फवारा चौकच्या वतीने आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील सुदर्शन शिंदे यांच्या शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.पुढे बोलताना आमदार गजबे म्हणाले की,समाजाच्या विकासातच राष्ट्राच्या विकासाची संकल्पना दडली आहे.ही बाब हेरुन शिवरायांनी सर्व धर्मियांना सोबतीला घेऊन स्वराज्याची मोट बांधण्यासाठी मानविय भावनेतून सलोखा निर्माण करून संकटांचा सामना केला.एकात्मतेचा दृढ विश्वासच त्यांच्या यशस्वीतेचा मजबूत पाया असल्याने व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असु शकतात.मात्र एकमेकांना समजून घेऊन वाटचाल केल्यास चांगली समाज व्यवस्था निर्माण करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी देखील शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टकात संघर्ष हेच जीवनाचे मुळ सार असुन संघर्षातुन ध्येय गाठणाराचा जीवनात यशस्वी होतो.दुसऱ्याचा आदर सन्मान केला की त्याची परतफेडही त्याच पद्धतीने होत असल्याने जीवनात संघर्ष करीत असताना मानवी मुल्ये जोपासले तरच शिवरायांना अभिप्रेत असलेल्या समाजाची,पर्यायाने देशाची निर्मिती करणे शक्य असल्याने सर्वांनी मिळून त्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन जेसा मोटवाणी यांनी केले. सदर कार्यक्रमा प्रसंगी माजी सभापती परसराम टिकले,एसआरपिएफचे सहाय्यक समादेशक डि.एस.जांभुळकर,माजी नगराध्यक्षा शालु दंडवते,आंबेडकरी चळवळीचे डाॅ.चंद्रशेखर बांबोळे,माजी नगरसेवक गणेश फाफट आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!