Friday, May 1, 2026
Homeनागपूरविद्यार्थ्यांना शिकविताना हृदयविकाराचा धक्का; मुख्याध्यापकाचा मृत्यू...

विद्यार्थ्यांना शिकविताना हृदयविकाराचा धक्का; मुख्याध्यापकाचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मुख्याध्यापक वर्गात विद्यार्थ्यांना शिकवित असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागले आणि ते खाली कोसळले.शिक्षकांनी त्यांना लगेच नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.सदरची घटना काल,शुक्रवारी २० सप्टेंबरच्या दुपारी १ वाजेच्या सुमारास वाई येथे घडली.
विजय शंकरराव धवड वय ५७ वर्षे, रा.ता.काटोल,जि. नागपूर असे मृत शिक्षकाचे नाव आहे.त्यांना काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते.ते वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत होते.
विजय हे शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे वर्गात विद्यार्थ्यांना शिकवित होते.मध्येच त्यांना अस्वस्थ वाटायला लागले आणि ते क्षणात खाली कोसळले. त्यामुळे शिक्षक विजय तभाने यांनी त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने कचारीसावंगा (ता.काटोल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.त्यांचे बंधू संजय शंकरराव धवड यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटोल शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!