- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-सामाजिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे मोहन लोहंबरे यांचा नुकतेच कुरखेडा तालुक्याच्या अरततोंडी देवस्थान येथील
श्रीराम मंदिर परिसरात झेंडा-पूजन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मोहन लोहंबरे हे नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.शेतकरी,कष्टकरी,शेतमजुर,बेरोजगार युवक-युवती,महिला,विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निरंतर कार्य करीत आहेत.त्यांची समाजाशी नाळ जुळलेली असल्याने त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिलेले आहे.त्यांचे कार्य बघता काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते म्हणून यापूर्वीही सत्कार करण्यात आला आहे.लोहंबरे यांनी काही महिन्यांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या समक्ष काँग्रेस पक्षात प्रवेश केला.अशातच ओबीसी काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी लोहंबरे यांना त्या काळी दिलेला मूलमंत्र आजच्या घडीला परिपूर्ण कामी आला असल्याचे प्रसंगी मोहन लोहंबरे यांनी सांगितले.
सत्कार सोहळ्यास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम,कुरखेडा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष जीवन नाट,मा.पं.समिती सभापती परसराम टिकले,कु.मेघा वामनराव सावसाकडे प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश,मनोज ढोरे प्रदेश सरचिटणीस ओबीसी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश,सागर वाढई,दुशांत वाटघुरे,सत्कारमूर्ती मोहन लोहंबरे,दिलीप लोहंबरे,वासुदेव लोहंबरे,विनोद दखणे, पूनेश्वर डोकरमारे,युवराज पाटणकर,होमराज मडावी,
भूषण डोकमारे,शाम होळीकर,रोशन होलीकर,लोमेश मडावी,मन्साराम कुमोटी,रमेश कुमोटी,संजय मानकर, राकेश लोहंबरे,एकनाथ तुलावी,मनोज कांबळेनरेश कुंभरे तथा गावकरी उपस्थित होते.

- Advertisement -

