Thursday, August 27, 2026
Homeनागपूरवाहतूक पोलिसांना मोबाइल फोनने फोटो काढून चालान करण्याची मान्यताच नाही.. -...

वाहतूक पोलिसांना मोबाइल फोनने फोटो काढून चालान करण्याची मान्यताच नाही.. – माहितीचा अधिकार अर्जाद्वारे उघड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइल फोनने वाहतूक पोलिस फोटो काढतात.परंतु असे फोटो काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मान्यताच नसल्याची माहिती खुद्द वाहतूक पोलिसांनी माहितीच्या अधिकारात दिली आहे.तरीदेखील वाहतूक पोलिस सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइलमध्ये फोटो काढत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वाहन चालवितांना अनेक वाहनचालक ट्रिपल सीट वाहन चालवितात.काही वाहनचालक सिग्नल तोडून पुढे जातात तर काहीजण भरधाव वेगाने वाहन चालवितात.अनेकदा वेड्यावाकड्या पद्धतीने वाहन चालविण्यात येतात.अशा वाहनचालकांचे फोटो चौकात उभे असलेले वाहतूक पोलिस आपल्या मोबाइलमध्ये बंदिस्त करतात.त्यानंतर हे फोटो अपलोड करून संबंधित वाहनचालकांना चालान पाठविण्यात येते.याबाबत वर्धमाननगर येथील आशापुरा अपार्टमेंटमधील तिलक खंगार यांनी लकडगंज वाहतूक पोलिसांना माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला होता.यात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतूक पोलिसांद्वारे मोबाइल फोनने फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता आहे की नाही,अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर लकडगंज वाहतूक परिमंडळाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतूक पोलिसांद्वारे मोबाइल फोनने फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नसल्याची माहिती पुरविली होती.
वरिष्ठ कार्यालयाची मान्यता नसतांना वाहतूक पोलिस अद्यापही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइलद्वारे फोटो काढत असल्यामुळे तिलक खंगार यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रथम अपील दाखल केले आहे.यात वाहतूक पोलिस कोणत्या अधिकारात हे फोटो काढत आहेत, अशी विचारणा करण्यात आली आहे.परंतु अद्याप आपल्याला माहिती मिळाली नसल्याचे खंगार यांनी सांगितले.वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नसतांनादेखील अद्यापही वाहतूक पोलिस वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइलद्वारे फोटो काढत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!