Thursday, October 15, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात ६३ वर्षीय इसम ठार…

वाघाच्या हल्ल्यात ६३ वर्षीय इसम ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बल्लारपूर (चंद्रपूर) :- बल्लारपूरयेथून जवळच असलेल्या कारवा जंगलात वाघाने एका व्यक्तीवर हल्ला करून ठार केले.ही घटना, काल ७ जानेवारी रोजी घडली.या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. ज्यात वाघाने एका व्यक्तीचा बळी घेतला आहे.२०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात २१ जण वाघांचे बळी ठरले. बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा १ मधील राखीव वनखंड क्रमांक ४९२ मध्ये काल रविवारी बल्लारपूरच्या राजेंद्रप्रसाद वॉर्डातील रहिवासी ६३ वर्षीय शामराव रामचंद्र तिडसुरवार यांना वाघाने भक्ष्य बनवले.शामराव रविवारी सकाळी १०.३० वाजता सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेले होते.वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले.या घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र अधिकारी बल्लारशाहच्या अधिनस्त वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.पाहणी केली असता वाघाने शिकार केल्यानंतर मृतदेह तेथेच टाकून दिल्याचे दिसून आले.मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिस विभागाचे कर्मचारी आणि मृताच्या नातेवाईकांसमोर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!