Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; एक किमी अंतरावर नेले फरफटत...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; एक किमी अंतरावर नेले फरफटत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या काही भागातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाघांचा मुक्तसंचार वाढलेला दिसून येतो.जंगलातील वन्य प्राणी संपुष्टात येऊ लागले की, भुकेने व्याकूळ झालेल्या वाघांचा हल्ला मनुष्यावर होऊ लागला आहे.अशातच जनावरे चारण्यासाठी शेतावर गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने जंगलात फरफटत नेत ठार केले असल्याची घटना काल,२६ ऑगस्टला दुपारी २  वाजताच्या सुमारास सावली तालुक्याच्या वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द)उपवन परिक्षेत्रातील उपरी वन बिटातील डोनाळा जंगल परिसरात घडली.आनंद वासेकर वय ५० वर्षे रा.डोनाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे शेतकरी आनंद वासेकर हे गावातीलच चिंदुजी नैताम व किशोर सोनटक्के यांच्यासोबत गुरे चराईसाठी गेले.गुरे चारत असताना वाघाने अचानक आनंद वासेकर यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जंगलात फरफटत नेले.हे दृश्य बघून त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही व्यक्तींनी आरडाओरड करीत गावाकडे धाव घेतली आणि गावात या घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती गावात मिळताच गावकरी जंगलाच्या दिशेने धावून गेले.याची माहिती वनविभागाला व सावली पोलिसांना देण्यात आली. वनविभागाने त्या परिसरात शोध मोहीम सुरू केली. घटनास्थळापासून एक किमी अंतरावर आनंद वासेकर यांचा मृतदेह मिळाला.घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे,उपवन परिक्षेत्र अधिकारी सूर्यवंशी,बीट वनरक्षक सोनेकर,महादेव मुंडे,वनरक्षक आखाडे,मेश्राम व वनकर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!