- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-वाघ म्हटला की,अनेकांची घाबरगुंडी होत असते.अशातच एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे दर्शन झाले तर..असाच प्रकार चिमूर तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे.चिमूर तालुक्यातील नेरी परिसरातील अनेक ठिकाणी एकाच दिवशी वाघ दिसल्याने नागरिक भयभीत झाले असून,या परिसरात नेमके किती वाघ आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे? मात्र,वनविभाग सुद्धा तेवढ्याच गतीने ॲक्शन मोडमध्ये असून माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांना सावधानतेचा इशारा देत वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला.
नेरी परिसरातील खुंटाला पट परिसरात पंढरवानी शेत शिवारात,तर सिरपूर मार्गावरील पहाडीच्या परिसरात वाघाने सायंकाळी साडेपाच वाजता दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली.या ठिकाणी वाघाला बघण्यासाठी नागरिकांनी एकच झुंबळ उडविली मात्र वाघ शांततेत झुडपात होता.सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच तात्काळ वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेरी क्षेत्र सहाय्यक रासेकर,वनरक्षक वडझे आणि त्यांची चमू घटनास्थळी दाखल होत वाघाला हुसकावून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला.नेरी येथील निखिल पिसे यांच्या शेतशिवरात सुद्धा वाघाचे दर्शन झाल्याने मजुरवर्गात तारांबळ उडाली,त्याचप्रमाणे चिमूर कडे जाणाऱ्या नेरी समोरील शेतशिवारात वाघ ठाण मांडून महिला मजुरांना दिसला.सिरपूर मार्गावरील नाल्याजवळ काही नागरिकांना वाघ दिसला.तर याच मार्गाने समोर वाघ हा चाफले यांच्या शेतात दिसल्याने कापूस वेचणाऱ्या महिलांची घाबरगुंडी उडाली,त्यांनी आरडाओरडा करून वाघाला हाकलून लावले.त्यामुळे या परिसरात नेमके किती वाघ आहेत; असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- Advertisement -

